Ticker

6/recent/ticker-posts

मोदी, शहा, मुंडे, फडणवीस, भुजबळ पवार, शिंदे अकोल्यात प्रचारात येणार

मोदी, शहा, मुंडे, फडणवीस, भुजबळ पवार, शिंदे अकोल्यात प्रचारात येणार


अकोला
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महिला आघाडी महायुतीचे घटक पक्ष यांनी घर चलो बुथ रिकामा अंतर्गत जिल्ह्यातील 2050 बुथ सेंटरवर जनसंपर्क करण्याचा संकल्प केला असून या दृष्टीने घटक पक्षातील सर्व पदाधिकारी सह कामाला लागले आहे
तीन एप्रिल रोजी परंपरागत समाजातील सर्व संस्कृती व आपल्या वेशभूषेध मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहे युतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ आंतरराष्ट्रीय नेते व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशाल सभा होण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित दादा पवार छगन भुजबळ पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे विकास पुरुष म्हणून ज्यांनी दळणवळणाची सोय उपलब्ध करून दिली असे लोकनेते नितीन गडकरी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सुद्धा प्रचारात येण्याची शक्यता असून यासंदर्भात प्रदेश महायुती कार्यालयातून लवकरच माहिती देण्यात येणार आहे


जिल्ह्यातील तेल्हारा अकोट वाडेगाव बोरगाव मंजू मालेगाव रिसोड, चोहट्टा बाजार, सभा चाचणी जिल्हा महायुती तसेच प्रदेश कार्यालयातून होत असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 15 एप्रिल ते 20 एप्रिल च्या दरम्यान विशाल जाहीर सभा होण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे.देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा येण्याची  शक्यता सांगण्यात आली आहे






महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या