लोकसभा निवडणुकीसाठी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल, वंचित तर्फे पहिला अर्ज तर 3 एप्रिलला भाजपाचे होणार नामांकन दाखल
अकोला, दि. ३० : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ०६- अकोला लोकसभा मतदार संघासाठी आज दोन नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. प्राप्त नामनिर्देशन पत्रे पुढीलप्रमाणे : प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), मुरलीधर लालसिंग पवार (अपक्ष). दरम्यान, आज ५१ व्यक्तींनी ८९ अर्जांची उचल केली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी ४ एप्रिलपर्यंत असून, दि. ३१ मार्च या सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.
२८ मार्च पासून अकोला लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याला सुरुवात झाली असून आतापर्यंत प्रमुख राजकीय पक्षाकडून एकही अर्ज दाखल झाला नाही चार एप्रिल अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून तीन व चार एप्रिल रोजी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनता पार्टी यासह महत्त्वाच्या राजकीय पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता असून अकोल्यात नेमकी कुणाची थेट लढत होणार यासाठी चार एप्रिलची वाट बघावी लागणार आहे. परंतु एकही नामकरण दाखल नाही. आज 30 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडी तर्फे पहिलाच नामांकन अर्ज प्रकाश यशवंत आंबेडकर तर अपक्ष म्हणून मुरलीधर लालसिंग पवार यांनी नामांकन अर्ज दाखल केली आहेत.
3 एप्रिलला भाजपा तर्फे होणार नामांकन दाखल
भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासप महायुती चे उमेदवार अनुप संजय धोत्रे आशीर्वाद विकास विजय संकल्प यात्रेच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर संजय कुटे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी तसेच आमदार आकाश फुंडकर , अनंतराव देशमुख आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल माजी आमदार विजय जाधव, गोपी किसन बाजोरिया विजय अग्रवाल विजय देशमुख,कृष्णा अंधारे, श्रीरंग दादा पिंजरकर अश्विन महाले विठ्ठल सराफ योगेश अग्रवाल शशी चोपडे किशोर पाटील जयंत मसने, डॉक्टर रणजीत पाटील वसंतराव खोटरे नारायणराव गव्हाणकर बळीराम सिरस्कार सुमन ताई गावंडे उज्वलाताई देशमुख अश्विनीताई हात वळणे अर्चनाताई मसणे वैशालीताई निकम उषाताई वीरक निचल, ताई, , चंदाताई शर्मा चंद्रशेखर पांडे गुरुजी प्रभाकरराव मानकर बाळासाहेब आपोतीकर हिरासिंग राठोड शिरू भाई उमेश पवार मनीराम टाले रामदास तायडे तेजराव थोरात माजी लोकप्रतिनिधी महायुतीचे सर्व तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी विविध आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 3 एप्रिल बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह लोकशाही संविधान वाचवणारे लोकनायक जयप्रकाश नारायण चौक भाजपा कार्यालय इथून नामांकन दाखल करण्यासाठी आशीर्वाद संकल्प विजय विकास यात्रेच्या माध्यमातून जाणार आहे. सुनील कोरडिया, भाजपा अकोला लोकसभा मतदारसंघ प्रसिद्धी मीडिया विभागतर्फे माहिती झाली आहे.
0 टिप्पण्या