Ticker

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग न्यूज, उच्च न्यायालयाने दिला निकाल अकोला पश्चिम विधानसभा मतदान रद्द

ब्रेकिंग न्यूज, उच्च न्यायालयाने दिला निकाल अकोला पश्चिम विधानसभा मतदान रद्द 


अकोला : विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदार संघातील रिक्त पदासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निर्णयाला अनिल शिवकुमार दुबे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून, उच्च न्यायालयात याचिका बोर्डावर येणार असल्याची माहिती अॅड. जगविजयसिंग गांधी यांनी दिली होती.


पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला किमान एक वर्षाचा कार्यकाळ मिळत नसल्याने या पोटनिवडणुकीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका अनिल दुबे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होईल व ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. मतमोजणीनंतर त्यांच्या लोकप्रतिनिधीला कर्तव्याचे निर्वाहन करण्यासाठी किमान एक वर्षाचा कार्यकाळ मिळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ मधील कलम १५१ (ए) नुसार उच्च न्यायालयात पोटनिवडणुकीला आव्हान देण्यात आले होते. 26 मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज अकोला  पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द झाली  असल्याची माहिती अॅड. बी. के. गांधी व अॅड. जगविजयसिंग गांधी यांनी दिली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या