Ticker

6/recent/ticker-posts

नवीन पिढीला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य- आ. प्रकाश भारसाकळे

नवीन पिढीला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य- आ. प्रकाश भारसाकळे  


अकोला
देशाची संस्कृती संवर्धनासोबत कायम ठेवणारे वनवासी आदिवासी समाज हा राष्ट्र चेतना तसेच प्रभू रामचंद्राच्या सोबत काम करणारा समाज या देशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल या समाजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांना नमन करून नवीन पिढीला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केले.
निवडणूक लक्षात घेऊन आज विरोधक वेगवेगळ्या रूपामध्ये फिरत आहे जे दिसत नव्हते निवडणूक लागल्याबरोबर कुकुरमुक्तासारखे गल्लोगल्ली फिरत आहे जे आपल्या परिवाराचा सन्मान करू शकत नाही ते मतदाराचा सन्मान कसा करणार असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.



 आदिवासी समाजासाठी आदिवासी उत्सव साजरा करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात उमेश पवार यांच्या टीमने परंपरा सुरू करून पश्चिम विदर्भात एक आदर्श निर्माण केला या आदर्श प्रमाणे दरवर्षी दर सणाला आपण आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि आज भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात 63 ठिकाणी कार्यक्रम करून जनतेची संवाद साधला अनेकांचे प्रश्न व त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या परंतु विरोधक त्याचा राजकारण करत असले तरी त्यांच्याकडे देण्यासारखं काही नाही त्यामुळे त्यांना कोणी विचारत नाही त्यांच्यावर विश्वास नाही त्यामुळे ज्यांच्यावर विश्वास असते त्यांनाच सवाल विचारून समस्या निराकरण करण्याची शाश्वती असते आणि त्याचमुळे विरोधकांचा अपप्रचार हा आपला भाजपाची महायुतीची ताकद असल्याचीही यावेळी उमेश पवार यांनी सांगून वारी हनुमान भैरवगड येथे उत्सव साजरा केला यामध्ये आदिवासी समाजाच्या विविध जाती पोट जाती सहभागी झाल्या परंपरागत पद्धतीने कार्यक्रम घेतला यामध्ये डॉक्टर संजय शर्मा प्रवीण ढेकर देवा भारसाकडे रोशन सोनवणे ब्रिजेश गवते दिलीप पवार ज्ञानेश्वर सोनवणे सह मोठ्या संख्येने गावकरी सहभागी होते.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या