Ticker

6/recent/ticker-posts

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील गंभीर प्रकार, दुषित पाणी पिल्याने 60 हुन अधिक विद्यार्थिनींना विषबाधा

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील गंभीर प्रकार, दुषित पाणी पिल्याने 60 हुन अधिक विद्यार्थिनींना विषबाधा



अकोला
अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील गंभीर प्रकार. अक्षम्य हलगर्जीपणामुळे दुषित पाणी पिल्याने  60 हुन अधिक विद्यार्थिनींना विषबाधा. सरकारी दवाखान्यात दखल न घेतल्याने खाजगी रुग्णालयात स्वतःहून उपचारार्थ दाखल. सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.




पोलीस प्रशिक्षण कार्यालयातील दूषित पाण्यामुळे 60 महिला पोलिसांची प्रकृती संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी ताबडतोब ही घटना राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर घालून ताबडतोब पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती संदर्भात व दूषित पाण्यासंदर्भात माहिती देऊन त्यांचे उपचार करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला व जिल्हा प्रशासनाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन त्यांचे उपचार करण्याचे निर्देश दिले या संदर्भात कायदा सुव्यवस्था सांभाळणारे तसेच गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या प्रकाराची दखल प्रशासन घेणार असून पोलीस कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या पोलीस प्रशिक्षण कार्यालयात झालेल्या प्रकरणात संदर्भात योग्य ती दखल प्रशाशन करणार आहे.भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनाही घटनेची माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी या संदर्भात दाखल घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली आहे व या संदर्भात वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली आहे.


दूषित पाण्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा, अंजलीताई आंबेडकर यांची रुग्णालयाला भेट


अकोला.. पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी तातडीने देशमुख हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रशिक्षणार्थी तरुणीवर अशी वेळ येणे ही दुर्दैवी घटना आहे, असे मत अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले.
रुग्णालयात भरती असलेल्या सर्व तरुणींना त्यांनी दिलासा दिला. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थींना दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख कांबळे यांची उपस्थिती होती.




महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या