शेगाव येथील शाळांमधे मातृ-पितृ पूजन उत्साहात
अकोला : विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक परंपरांचे पालन करावे, नैतिक गुण अंगीकारून समाजाला चांगली दिशा द्यावी. या नैतिक मूल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने महानगरात मातृपितृ पूजन पंधरवाडा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संत आसाराम बापू आश्रम, पातूर रोड येथील भाविकांच्या वतीने आयोजित या मातृ-पितृ पूजन पंधरवड्यात हरलालका इंग्लिश स्कूल शेगाव तसेच स्वामी विवेकानंद हायस्कूल, आदिवासी स्कूल जानोरी, शेगाव, महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय शिवनेरी चौक, जिल्हा बुलढाणा येथील शाळांमधे माता पित्याची पूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सविस्तर वृत्त येथे डोम👆 पहा.....
अॅड. राजेश इंगळे व प्रा. मालती रोंदळकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या शालेय संस्कार अभियानात बाल विद्यार्थ्यांनी आपल्या आई- वडिलांची पूजा करून त्यांना नमस्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. यावेळी हराल का स्कूल चे मुख्याध्यापक नायसे सर सुनिता भरतिया डॉक्टर गणोरकर तर स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक जयश्री चोपडे आदिवासी स्कूल चे मुख्याध्यापक उगले सर महात्मा ज्योतिराव फुले शाळेतील मुख्याध्यापक अमोल चिंचोळकर आदी शाळांचा शिक्षकांचा पालकांसह मोठा सहभाग होता.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या