रस्त्याचे दोन्ही बाजुंनी 3 मीटर अतिक्रमण निघणार डाबकी रोडवाशी यांना दिलासा
अकोला - डाबकी रोड हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून वाढत्या रहदारीमुळे वारंवार ट्रॅफिक ची समस्या निर्माण होत आहे यासाठी स्व आ गोवर्धन शर्मा यांचे स्थानीक विकास निधीमधून विकसित आराखड्यानुसार 18 मीटर प्रस्तावित असलेल्या रस्त्याचे दोन्हीं बाजूला रुंदीकरण करावयाचे असल्यामुळें प्रत्येक बाजूला तीन मीटर असे अंडरग्राउंड केबल सहित काम प्रस्तावित आहे तशी कामाची वर्क ऑर्डर निघाल्याचे अतिक्रमण विभागlचे म्हणणे आहे परंतू अतिक्रमण काढत असताना बऱ्याच ठिकाणी प्लॉट दुकान तसेच घर असणाऱ्यांच्या स्वमालकीच्या जागेत मार्किंग केल्यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झालामुळे "व्यापारी संघ डाबकी रोड" अकोला यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेवून आपल्या समस्या त्यांना अवगत केल्या असता त्यांचे प्रतिनिधी म्हणुन उपायुक्त सौ गीता ठाकरे मॅडम यांनी समस्या जाणून घेवून अतिक्रमण विभाग अधिकारी,पाणी पुरवठा अधिकारी श्री माणिकराव यांना बोलावून व्यापारी संघ डlबकी रोड यांचे शंकेचे निरसन करून प्रस्तावित आसलेल्या दोन्ही बाजूंनी 3 मीटरचे असलेले अतिक्रमण नागरिकांनी ताबडतोब स्वतः काढून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान केलें व तसे निर्देश अतिक्रमण विभाग यांना देवुन नागरीकांना विणlकlरण त्रास होणार नाही असे सांगीतले तसेच प्रस्तावित रस्त्याचे खाली अमृत योजनेची मुख्य वाहिनी जात असून त्याचे खाली असलेल्या जूना पाणीपुरठा बिडची पाइपलाइन आहे ज्यामधून मधून नागरीकांना जोडण्या (कनेक्शन) दिलेल्या आहेत त्या योग्य करून रस्त्याचे कlमामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश पाणीपुरवठा अधिकारी माणिकराव यांना दिले. झालेल्या चर्चेमध्ये "व्यापारी संघ डाबकी रोड"यांचे प्रतिनिधी म्हणुन डॉ अशोक ओळंबे, अतुल पवनिकर, नगरसेवक शशी चोपडे, विलास गोतमारे,अतूल येळने,योगेश ढोरे अड सचिन बlळापुरे,श्याम पोद्दlर प्रा शिवकुमार चौबे अनंत्ता लोटे, दिपक महल्ले, दिपक कुंडवाल किशोर वाघ,यांनी उपायुक्त गिता ठाकरे मॅडम, पाणीपुरवठा अधिकारी श्री माणिकराव व अतिक्रमण विभागाचे प्रतिनिधी यांचेशी अतिक्रमण हटावमोहिम व नागरिक, व्यापारी यांचे समस्या संबंधी सविस्तर चर्चा केली. यावेळी महापालिका परिसरात डlबकी रोड येथील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या