अद्याप वृद्ध कलाकार समितीचे गठन नाही.मात्र स्वयंघोषित अध्यक्ष व सदस्यांकडून कलावंताच्या नविन प्रस्तावाची तयारी जोरात
"खबरदार . .. !! लाभार्थी कलावंताचे मानधन अर्जाला मंजूरी देतांना,भ्रष्टाचार केल्यास, कुणालाही सोडणार नाही. -विदर्भ लोककलावंत संघटनेचा इशारा."
वाशिम : जिल्ह्याचे अतिकार्यतत्पर पालकमंत्री बंजारा नेते असल्यामुळे ते ज्या ज्या वेळी वाशिम जिल्ह्याचे जावाई म्हणजे पालकमंत्री म्हणून येतात.त्या त्या वेळी इतर समाजाच्या लोककलावंताला अध्यक्षपदाची संधी मिळणे कठीणच असते.गेल्या पाच वर्षापासून सातत्याने "विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा" ही कलावंताची अग्रणी संस्था, शासकीय निमशासकिय समित्याच्या आणि जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीच्या गठनाची कायदेशीर मागणी करीत असतांना आणि गेल्या बुधवार दि. 24 जानेवारी 2024 रोजी विदर्भ लोककलावंत संघटनेने, जिल्हयातील शेकडो कलावंताचे विराट असे "क्रांतिकारी धरणे आंदोलन" केले असतांनाच दुसरीकडे मात्र जिल्हयातील एका बंजारा समाजाच्या कलाकाराची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची जोरात स्वयंघोषीत चर्चा असून,ह्या व्यक्तीचा त्यांच्या मित्रमंडळी कडून जोरात प्रचार प्रसार सुरु आहे.शिवाय भजनीमंडळीना मानधनाचे नविन प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.त्यामुळे विदर्भ लोककलावंत संघटने कडून,जिल्हाधिकारी यांना मानधन योजनेत कोणताही भ्रष्टाचार होणार नाही.याची काळजी घेण्याचे निवेदन देण्यात आले असून, "आधी पाच वर्षातील लाभार्थ्यांचे जुने प्रलंबित अर्ज निकाली काढा. नंतरच नविन अर्जावर विचार करा." या मागणीकरीता येत्या,दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना विदर्भ लोक कलावंत संघटने कडून निवेदन देणार असून, "मानधन मंजूरी करीता लोककलावंतानी शासकीय अधिकाऱ्यांशीच संपर्क साधावा.त्याकरीता बाहेरच्या कोणत्याही दलाल किंवा एजंट व्यक्ती सोबत आर्थिक व्यवहार करू नये.आणि कुणी लोककलावंताना पैशाची मागणी केली.तर सापळा रचून त्यांची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय वाशिम किंवा अमरावती यांचेकडे करावी. व भ्रष्टाचारी व्यक्तींना अटक करण्यास मदत करावी.असे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कलावंताना केले आहे.
0 टिप्पण्या