Ticker

6/recent/ticker-posts

ब्ल्यू लाईन, रेड लाईन मुळे शहरातील एक लाख नागरिक होताहेतप्रभावीत

ब्ल्यू लाईन, रेड लाईन मुळे शहरातील एक लाख नागरिक होताहेत प्रभावीत


चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासणार काळे शिवसेनेचा आज पत्रकार परिषदेत इशारा


अकोला शहरातून वाहणारी मोर्णा नदीच्या दोन्ही बाजूला नागरिक राहत आहेत मात्र नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे नदीचे पुराचे संभावीत क्षेत्र सोडून लोकवस्ती असावी यासाठी शासनाचा पाटबंधारे विभागाचे अधिकारी घरीच बसून सर्व्हे करीत आहेत त्यामुळे चुकीचा सर्व्हे होऊन लोकांना शहरातील सुमारे एक लाख लोकांना याचा त्रास होत असून त्या चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांची चूक दुरुस्त करून द्यावी अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वतीने महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा आज अकोल्यात पत्रकार परिषदेत दिला आहे.


अकोल्यात सन 1995मध्ये, त्यानंतर 2002आणि 2021मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे शहरात सगळीकडे पाणीच पाणी होते. त्यानंतर शासनाच्या पाट बंधारे विभागाचे अधिकारी ह्यांनी चुकीचा सर्व्हे करून चुकीच्या ठिकाणी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन टाकली आहे प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात मार्किंग केले नाही. त्यामुळे ले आऊट झालेल्या ठिकाणी ह्या लाईन आल्या तर काही ठिकाणी काही मंदिर तर मध्यवस्थितील लोकांच्या घरात ह्या लाईन आल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या घरांची बांधकामे प्रभावीत झाली आहेत मनपा चा नगरविकास विभागाकडून नकाशाना परवानगी मिळण्याचे थांबले आहे. आधीच सत्ताधारी भाजपने शहराचा विकास 30वर्षे मागे नेला आहे. त्यात या अधिकाऱ्याच्या चुकीने आणखी भर घातली आहे त्यामुळे चूक करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनी चूक दुरुस्त करून द्यावी अन्यथा शिवसेना त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा,उपजिल्हा प्रमुख गजानन बोराळे, शहर संघटक अनिल परचुरे, सह संघटक तरुण बगेरे, युवा सेनेचे नितीन मिश्रा, रवि म्हस्के, संजय अग्रवाल आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या