Ticker

6/recent/ticker-posts

मातृ शक्तीने जन संपर्क माध्यमातून कार्य करावे- चित्राताई वाघ 

मातृ शक्तीने जन संपर्क माध्यमातून कार्य करावे- चित्राताई वाघ 


अकोला- आशा वर्कर्स बचत गट सोबत महिलांना शक्तीकरण सबलीकरण सोबत आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार करत आहे केवळ गप्पांचा बाजार न करता सातत्याने रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाममात्र दरावर कर्ज उपलब्ध करून देऊन सबसिडी देऊन घरगुती रोजगाराला चालना देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यामुळे देशातील मातृशक्ती खंबीरपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी आहे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाला विजयी करण्यासाठी केवळ जनसंपर्क करणे ही जबाबदारी मात्र महिला आघाडीने स्वीकारून भारतीय जनता पक्षाला देश सुजलाम सुफलामसुफलाम शक्तिशाली राष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातकरण्याच्या दृष्टीने कामाला लागा आणि 12 फरवरी रोजी प्रत्येक मंडळामध्ये हजारोच्या संख्येत मातृशक्ती पंतप्रधान यांच्याशी संवाद साधण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी कामाला लागा असे आवाहन प्रदेश भाजपा महिला आघाडी अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले स्थानिक भाजपा कार्यालयात अकोला ग्रामीण व अकोला महानगर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होत्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रा ताई वाघ, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रश्मीताई जाधव, महाराष्ट्र प्रदेश सचिव शुभदा नायक, राजस्थान प्रदेश महामंत्री जयश्री दिदी गर्ग, राजस्थान प्रदेश उपाध्यक्ष अंजू दिदी मिश्रा आदरणीय सुहासिनी ताई धोत्रे म्हणजे सावरकर नूतनताई पिंपळे जिल्हाध्यक्ष वैशालीताई निकम महानगर अध्यक्ष चंदाताई शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीचे प्रास्ताविक महानगर अध्यक्ष चंदाताई शर्मा आणि जिल्हाध्यक्ष वैशालीताई निकम यांनी केले तसेच सुहासिनीताई धोत्रे जयश्रीताई गर्ग यांनी उपस्थित महिलांशी सुसंवाद साधला.
प्रदेशाध्यक्ष चित्राताई यांनी नमो बचत गट महिला लाभार्थी योजना नव मतदार लोकसभा नियोजन घर चलो अभियान इत्यादी संदर्भात सर्व महिलांना माहिती दिली त्याचप्रमाणे सहकारी संस्थेविषयी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी कायंदे आणि माया धुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी उपमहापौर वैशालीताई शेळके यांनी केले कार्यक्रमांमध्ये बचत गट महिला अल्पसंख्यांक मुस्लिम महिला बार्शीटाकळी यांचा प्रदेशाध्यक्ष चित्राताई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या बैठकीला सुमनताई गावंडे वैशाली शेळके कुसुमताई भगत राधा तिवारी प्रिया कोथळकर छाया मानकर अर्चना मसने शोभा काकू बोडखे, संध्याताई लोहकपुरे, उज्वला पुंडकर छाया तोडसाम राखी तिहिले निशा कडी मनीषा भुसारी निकिता देशमुख विजया देशमुख गंगाबाई शिंदे, प्रणिता समरीतकर भाग्यश्री मापारी ज्योती ताले जयश्रीताई फुंडकर, जयमाला खेडकर, माधुरीताई क्षीरसागर, ज्योती मानकर साधना येवले सुनिता दळवी मालतीताई रणपिसे, चंदाताई ठाकूर नीता बागडे रविता शर्मा दीपिका ठाकूर अर्चना गौतम ऋचा शाह चंदाताई लव्हाळे मुक्ता ताले मोनाली गावंडे, पुष्पाताई रत्नपारखी संगीता जाधव, यांच्यासह सर्व नगरसेविका सर्व मंडळ अध्यक्ष पदाधिकारी आणि संपूर्ण अकोला जिल्ह्यातील सर्व संपूर्ण महिला आघाडी उपस्थित होते. यावेळी कमल सखी मंचा सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे यांनी महिला बचत गट व आशा वर्कर यांच्या कामाची प्रशंसा करून मातृ शक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असून आगामी लोकसभा विधानसभा महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी अभिवचन त्यांनी मतदारांच्या वतीने दिल्या असून भाजपा लोकप्रतिनिधी सातत्याने विकासाचे काम करत असताना केवळ भाजपाच्या लोकप्रियतेची व काम करण्याच्या पद्धतीमुळे विरोधक हदबल झाले असून कशाचाही राजकारण करून खोटे श्रेया स्पर्धा सुरू असून मतदार राजा सगळ्या गोष्टी माहीत असते सोशल मीडियामुळे जागृती आली आहे परंतु विरोधक सध्या पराभवच्या भूमिकेत असून त्यांना केवळ मोदी आणि भाजपा लोकप्रतिनिधी यांच्या विरोध दिसत असल्याचाही आरोप त्यांनी भाषणात केला या याचा उत्तर मातृ शक्तीने जन संपर्क माध्यमातून देऊन कार्य करावे अशीही त्यांनी आवाहन केले यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल व माहिती चित्राताई वाघ यांनी देऊन उद्धव ठाकरे सेना व सुळे गट तसेच काँग्रेसवर टीका केली ‌


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या