Ticker

6/recent/ticker-posts

शुभम तिडके यांची राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जिल्हा चिटणीस पदी निवड

शुभम तिडके यांची राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जिल्हा चिटणीस पदी निवड


अकोला - अशोका फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शुभम भाऊ तिडके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कुष्णाभाऊ अंधारे यांच्या मार्गदर्शनात पक्षामध्ये प्रवेश केला.शुभम भाऊ तिकडे यांची राष्ट्रवादीच्या (अजितदादा पवार) गटाच्या ग्रामीण जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती ही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट)राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. असुन बाळापूर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.


 येत्या नगरपरिषद तथा विधानसभा निवडणुकीत बाळापूर तालुक्यात चुरशीची लढत होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार यावेळी शुभम भाऊ तिडके यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुष्णाभाऊ अंधारे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनात अकोला जिह्यात बळकट होत असून बाळापूर विधानसभेत कृष्णा भाऊ अंधारे यांना आमदार करण्यासाठी शुभम भाऊ तिडके यांनी आपल्या सहकार्यानसह कंबर कसली आहे.यावेळी बाळापूर तालुक्यातील तसेच अकोला जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या