Ticker

6/recent/ticker-posts

खेट्री येथे हातपंपाच्या कामाला सुरुवात सरपंचाच्या पुढाकाराने ग्रामस्थांना दिलासा

खेट्री येथे हातपंपाच्या कामाला सुरुवात
सरपंचाच्या पुढाकाराने ग्रामस्थांना दिलासा

प्रतीनीधी- नासीर शेख 
पातूर :  पातुर पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथे दलित वस्तीमध्ये एकच हातपंप असल्याने महिला व ग्रामस्थांची पाण्यासाठी वर्षाच्या बाराही महिने भटकंती होत आहे. एकच हातपंप असून, त्याचाही पाणी दूषित असल्याने ग्रामस्थांना  दूषित पाणी प्यावे लागत आहे. दलित वस्तीतील ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे वारंवार केलेल्या मागणीवरून सरपंच जहूर खान यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा परिषदेने हातपंपासाठी ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करून दिला आणि अखेर सरपंच जहूर खान, यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून, हातपंपाच्या कामाला सुरुवात झाल्याने दलित वस्तीतील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. यावेळी सरपंच जहूर खान, सदस्य आशा उपर्वट,सामाजिक कार्यकर्ते गजानन लांडे, बाबुराव तिडके, तुकाराम वाडेकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या