भाजपा महिला आघाडीने साधला थेट 5000 महिलांशी संवाद
अकोला
फुले आंबेडकर शाहू महाराजांच्या नावाचा उपयोग न करता प्रत्यक्षात त्यांना अभिप्रेत कार्य भारतीय जनता पक्षाचे नेते करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने त्यांनी केलेल्या कार्याला नमन करून सामाजिक दायित्व म्हणून कार्य करत असून राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना पंचामृत म्हणून योजना जाहीर केल्या होत्या त्या योजना पूर्णपणे एका वर्षामध्ये लागू करून सर्वसामान्यांना आधार दिला एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्याचा इतिहासिक निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी केली व एसटी बस ही तोट्याची नफ्यात आणण्याची किमया मातृशक्तीने केली आज लाल परी ही अयोध्या पर्यंत उत्तर प्रदेश पर्यंत जाऊन कमाई करण्याचे साधन करत आहे.
भक्तांना सुविधा उपलब्ध करून देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सुजलाम सुफलाम व प्रगतिशील व्हावा याकरिता मागील गणेश चतुर्थी निमित्त स्थानिक बस स्थानक आगर डेपो नंबर दोन मध्ये हळदी कुंकू करून मातृ शक्तींचा आशीर्वाद भाजपा महिला आघाडीने घेऊन विविध वाण वितरण करून घर घर चलो अभियान व दहा वर्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार खासदार संजय भाऊ धोत्रे व भाजपा लोकप्रतिनिधी यांच्या कामाचा आराखडा जनतेसमोर सादर केला लोकशाही मधील महत्त्वाचा राजा घडवणारा मतदारांशी थेट संपर्क करून केलेल्या कामाची माहिती हिशोब देणे हे कर्तव्य असून यासाठी भाजपा महिला आघाडीने आज थेट संपर्क साधून 5000 महिलांची संवाद साधला . भाजपा प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी किरणताई वाघ यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम भाजपा महिला आघाडीने महानगर व जिल्ह्यामध्ये सुरू केल्या असून हार्दिक कुंकू व योजनेची माहिती पोहोचवण्याचं काम सुरू केला असून सौ सुहासिनीताई धोत्रे, सौ.मंजुषाताई सावरकर,सौ. पुष्पाभाभी खंडेलवाल, सौ.अर्चनाताई मसने आणि सौ. अर्चनाभाभी शर्मा, सौ सीमाताई मांगटे आणि महानगराध्यक्ष श्री जयंत भाऊ मसने सुनिता ताई अग्रवाल विजय अग्रवाल चंदाताई शर्मा यांच्या नेतृत्वात, रोजी नवीन बस स्टँड येथे माघी श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त येथे 🖕पहा ...
यावेळेस सर्व महिलांना हळदी कुंकू लावून तिळगुळ आणि वाण देण्यात आले.बस स्टँड वर उपस्थित महिलांना अतिशय आनंद झाला आणि काहींनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देऊन मोदी सरकार पुनश्च यावे यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महिला मोर्चा अध्यक्ष चंदा ताई शर्मा,सुमन ताई गावंडे,वैशाली ताई शेळके,संध्या लोहकपुरे, जान्हवी डोंगरे,रंजना विंचनकर, विजया देशमुख,साधना येवले,रश्मी कायंदे,माधुरी क्षीरसागर,ज्योती मानकर,सुनीता दळवी, वर्षा गावंडे,मनीषा भुसारी, संगीता पडोळे,अस्मिता वगारे, सुरेखा दुबे,छाया तोडसाम,अनिता चौधरी,वैशाली देवकते, मालती रणपिसे,ज्योती शिंगणाद,प्रणिता समरीत्कर,रंजना पवार ई सर्व पदाधिकारी उपस्थित होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या