Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमती सीतादेवी गोलेच्छा कोंवेट येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

श्रीमती सीतादेवी गोलेच्छा कोंवेट येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


कारंजा शहरातील जूना बस स्टेण्ड परिसरातील श्रीमती सीतादेवी गोलेच्छा कोंवेट मध्ये दि.6 फेब्रु रोजी सांय.6 वाजता वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी शाळेतल्या विद्यार्थीनी विविध प्रकाराचे नृत्य सादर करुण मान्यवर व पालक वर्ग, प्रेक्षकाना मंत्रमुग्ध केले..या कार्यक्रमा चे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी श्रीकांत माने तर उद्घाटक प्रकाशचंद गोलेच्छा व संस्था अध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा प्रमुख अतिथि म्हणून पो.उप.नी अंभोरे मॅडम, प्राजक्ता माहीतकर,सविता काळे, नीता लांडे, शुभांगी रावले, शाळा संचालिका निशा गोलेच्छा,संस्था सचिव विनीत गोलेच्छा आदिची उपस्थिति होती,या वेळी गटशिक्षण अधिकारी माने यांनी शिक्षकाना मार्गदर्शन करताना त्यांनी अधिक परिश्रम करुण चाँगले उपक्रम आयोजित करावे असे सांगितले सोबतच विद्यार्थीयांना सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले,शाळेतील लहान लहान चिमूकल्यानी विविध नृत्य सादर करुण देशातिल एकता अबाधित राहन्यासाठी देशभक्ति चे नृत्य करुण उपस्थित पालक वर्ग अतिथि मान्यवराना मंत्र मुग्ध केले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सरिता राठोड,अर्पिता कुरहे , मोहिनी मुंदे, सुषमा कटके, छाया बेद्रे , वैशाली राउत, स्वाती खोड़े, वैशाली परकोटे, रुपाली बोळे, कुलश्री सावजी, ममता चव्हान , राजकुमारी अहेरवार, सुरेश गोहर, शिक्षक हृषिकेश रुनवाल आदिनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्तविक नरेन्द्रजी गोलेच्छा यांनी व तर आभार निशा गोलेच्छा यांनी मानले. सूत्रसंचालन शिक्षिका शीतल ठाकरे यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येनें पालक वर्ग उपस्थित होते..


धर्मबिज निमित्ताने,वैदर्भिय नाथ समाज संघाचा धर्मबीजोत्सव व नाथ समाज मेळावा उत्साहात संपन्न

कारंजा : नाथ समाज कार्यात अग्रेसर असलेल्या वैदर्भीय नाथ समाज संघ कारंजाच्या वतीने दि. 11 फेब्रुवारी 2024,रविवार रोजी मौजे पुंडा, तालुका अकोट येथील नंदी महादेव संस्थानमध्ये भव्य धर्मबीजोत्सव व विभागीय नाथ समाज मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.सदर मेळाव्यास अध्यक्ष म्हणून माजी आ. डॉ. रणजीत पाटील माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र, तर उद्घाटक म्हणून ॲड. विशाल गणगणे, (पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा तथा अकोला लोकसभा संयोजक भारतीय जनता पार्टी) हे लाभले होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.रोहित दादा माडेवार, (महाराष्ट्र प्रदेश महामंत्री,
भटके विमुक्त आघाडी,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र),सुश्री. वंदना यनगंटवार (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, भटके विमुक्त महिला आघाडी, भारतीय जनता पार्टी),सौ.सीमा दिनेश कश्यप (भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश विदर्भ संयोजिका), माजी आमदार नारायणराव गव्हाणकर ,माजी आमदार वसंतरावजी खोटरे ,वैदर्भिनाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथजी पवार,सचिव संतोषनाथजी सातपुते, डॉ.अशोक कोळंबे (भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य), दिवाकरनाथजी गौरकर (विदर्भ समिती अध्यक्ष वैदर्भिनाथ समाज संघ), डॉ. संजय चौधरी (अकोला भाजपा नेते) सौ कीर्तीताई ठाकरे (पश्चिम महाराष्ट्र समिती अध्यक्ष वैदर्भीयनाथ समाज संघ) डॉक्टर अरविंद लांडे (विधानसभा प्रमुख ओबीसी मोर्चा भाजपा), गजानननाथ जी इंगळे (पश्चिम विदर्भ समिती उपाध्यक्ष वैदर्भिनाथ समाज संघ) तथा कनकशेठ कोटक (माजी शहराध्यक्ष भाजपा आकोट) हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैदर्भीय नाथ समाज संघाचे अध्यक्ष एकनाथ पवार यांनी केले. त्यामध्ये त्यांनी नाथ समाजाच्या व्यथा आपल्या प्रास्ताविकातून मांडल्या तर नाथ समाजाला सद्यस्थितीमध्ये असलेले आरक्षण हे पुरेसे नसून एन टी बी प्रवर्गामध्ये नाथ समाज हा अल्पसंख्यांक असून सदर समाजाकरिता भटक्या जमातीमध्ये स्वतंत्र प्रवर्ग स्थापन करण्याची निर्माण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच नाथ समाजाला राजकीय नेतृत्व नसल्यामुळे आमचा समाज हा विकासाच्या कक्षेत अजूनतागायत आलेला नसल्याचे नमूद करून याकरिता सत्ताधारी पक्षाने त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता त्यामध्ये घरकुलाचा विषय असो, जातीच्या दाखल्याचा विषय असो अथवा बेरोजगार तरुणांचा विषय असो त्याला कुठेतरी राज्य सरकारने प्रतिसाद दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 


तर काही आमदार समाजाला फक्त आश्वासन देऊन त्यांना त्या आश्वासनांचा विसर पडतो आहे हे आवर्जून त्यांनी सांगितले.आपल्या मार्गदर्शनपर मनोगतांमध्ये सुश्री वंदना यनगंटवार,रोहित माडेवार ,सौ सीमा दिनेश कश्यप या भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी नाथ समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता निश्चितच भरीव प्रयत्न आपल्या स्तरावरून करू असे यावेळी सांगितले.तर माजी आमदार गव्हाणकर तथा खोटरे साहेबांनी सुद्धा मेळाव्यास मार्गदर्शन केले तर ॲड.विशाल गणगणे यांनी नाथ समाजाच्या विविध प्रश्नांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी लवकरच चर्चा करून जवळपास सर्व समस्यांचे समाधान आपण करूयात. याकरिता समाजाची साथ आम्हाला लागेल असे आवाहन त्यांनी केले. नाथ समाजातील गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्यामध्ये अमरावती कारागृहातील जेलर पदी नियुक्ती असलेल्या मीरा विजय बाबर यांचा तसेच श्री गजानननाथजी इंगळे,श्री संतोष नाथजी चिलवंते व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाथ समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील विविध पदांवरील नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाच्या शेवटी वैदर्भीय नाथ समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थापक अध्यक्ष एकनाथजी पवार यांचा सहृदय जाहीर सत्कार केला तर हा सत्कार म्हणजे माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण असून संपूर्ण आयुष्य समाजासाठी कार्य करण्याचे वचन यावेळी एकनाथ पवार यांनी दिले सदर कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी प्रकर्षाने वैदर्भीय नाथ समाज संघाचे राज्य संपर्कप्रमुख अभिषेकनाथजी पाठक यांनी मोलाची भूमिका बजावली तर नाथ वैदर्भीयनाथ समाज संघाचे मार्गदर्शक पुंडलिकनाथजी पाठक, शरद नाथजी पाठक, पुंडलिकनाथजी जाधव महाराज , जालिंदरनाथ जी जाधव , देवानंदनाथ इंगळे आणि भारत नाथजी ठाकरे गुरुजी , विठ्ठल पाठक,पंकज जाधव, अनिकेत पाठक मुकेश पाठक, नितीन पाठक,मच्छिंद्र जाधव तसेच पुंडा येथील समस्त नाथ समाज बांधवांनी अथक परिश्रमाने हा मेळावा यशस्वी केला असल्याचे अध्यक्ष एकनाथ पवार यांनी आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना कळवीले आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या