Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महिला मेळावा दहा फेब्रुवारीला

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महिला मेळावा दहा फेब्रुवारीला


 अकोला. राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष नानासाहेब घोलप यांच्या आदेशाने महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन भटकर यांचे संकलपनेतून निर्माण झाल्यानुसार अकोला जिल्हा महिला आघाडीच्या वतीने गेल्या आठ वर्षे पासून दरवर्षी मकरसंक्रांत निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन केले जात असते . यावर्षी गांधी रोडवरील प्रमीलाताई ओक हॉल अकोला येथे १०फेब्रुवारीला सकाळीं अकरा वाजता पासून महिला मेळाव्याचे कार्यक्रम चालु करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन भटकर ,पश्चिम युवा आघाडी अध्यक्ष रामा उंबरकर , जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभारी संज्योतीताई मांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


या महीला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय नेते बबनराव घोलप हे असतील. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा महिला आघाडीच्या प्रभारी सौ. संज्योतीताई मांगे ह्या असणार आहेत. आणि प्रमूख मार्गदर्शक म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष एड. रोहिणीताई खडसे, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर, समिभा पाटील, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष नलिनीताई सौंदनकर, राष्ट्रीय सचिव सरोज ताई बिसुरे, अकोला मनपाच्या माजी महापौर अर्चना ताई मसने , सौ प्राचीताई वखरे , राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय प्रवक्ते रविंद्र राजुस्कर प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड आदींची उपस्थिती राहणार असुन महीला प्रदेशाध्यक्ष मीनाताई भगवतकर , प्रदेश सचिव सीमाताई राजगुरू, प्रदेश उपाध्यक्षा मीनाक्षी पान झाडे आदींच्या मार्गदर्शनात हा महीला मेळावा संपन्न होणार असुन महिलांनी मोठया प्रमाणावर उपस्थीत राहण्याचे आवाहन पश्चीम युवा प्रमूख रामा उंबरकर, जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे, महानगर अध्यक्ष शिवलाल इंगळे, ज्येष्ठ नागरीक संघाचे पांडुरंग वाडेकर, सौ.मंगला चोपडे, संध्याताई घोपे, कविता बुंदे, वनिता गवई, वर्षा चीमकर, सविता मानकर सह राष्ट्रिय चर्मकार महासंघाच्या सर्व शाखा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या