वारसा हक्काची प्रकरणे, आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वेतन बढती व पाचव्या ते सातव्या वेतन आयोगाच्या रकमेसह विविध मागण्यासाठी कारंजाचे सफाई कामगाराचे धरणे आंदोलन
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : कारंजा नगर पालिकेच्या सफाई कामगाराच्या प्रलंबीत असलेल्या विविध मागण्यांविषयी सफाई कामगारा मध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होऊन शहरातील सर्वच सफाई कामगार प्रदेश सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष श्याम घारु यांच्या मार्गदर्शनात एकवटले असून,शेकडो सफाई कामगाराचे उपस्थितीत मंगळवार दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी,अखिल भारतिय सफाई मजदूर काँग्रेस शाखा कारंजाच्या वतीने,सफाई कामगारांच्या वारसाहक्काची प्रकरणे निकाली काढावी. न्यायालयाच्या निकाला प्रमाणे पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ द्यावी. सफाई कामगारांना शासन नियमान्वये शासकीय सुट्याचा लाभ मिळावा.न.प. कडून सफाई कामगारांना श्रमसाफल्य योजनेतून घरांचे बांधकाम करून मिळावे. रोजंदारी कर्मचाऱ्याची पी.एफ. रक्कम परतावा करावा.
परिभाषित अंशदायी पेन्शन योजनेकरीता सफाई कर्मचाऱ्याचे खाते उघडून खाते क्रं.मिळावा. वरिष्ठ सफाई कामगारांना दहा विस तिस आश्वासित प्रगती योजनेच्या बढतीचा वेतन लाभ मिळावा.वेतनामध्ये सातवा वेतन आयोग लागू करून त्याचा लाभ व अग्रिम रक्कम देण्यात यावी. इत्यादी मागण्यांकरीता शेकडो कामगार कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी व वरिष्ठांना निवेदन देऊन मागण्यांची स्थानिक प्रशासनाने पूर्तता न केल्यास भविष्यात आंदोलन तिव्र करीत दि 15 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातून तहसिल व उपविभागीय कार्यालयापर्यंत सफाई कामगाराच्या विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. असे श्याम घारू,रमेश ढेणवाल, ईश्वर मेहरोलिया, सौ रेखा गुळदे, आनंद सारवान, रवि जयदे, सुनिल मडामे, संजय ढेणवाल, सुरेश गोहर, मुकेश मेहोरोलिया, विजय घोगलीया, दिलीप सारसर, अजय करोसे, सौ संजु प्रेम डेंडूळे, सौ प्रिती दिनेश सारवान, धलचंद चव्हाण,मोती संगेले, नितीन घोगलिया, गोपाल जाधव, दिपक गोहर,धनराज करोसे आदींनी केले आहे.असे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना आंदोलन स्थळी प्रत्यक्ष मुलाखत श्यामजी घारू यांनी सांगितले.
0 टिप्पण्या