चला साजरा करूया खरा प्रेम दिवस, 14 फेब्रुवारी हा माता-पिता पूजनाचा दिवस
चला साजरा करूया खरा प्रेम दिवस, 14 फेब्रुवारी हा माता-पिता पूजनाचा दिवस आहे. व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस साजरे करून परदेशातील भारतीय लोकसंस्कृती लोप पावत आहे. आपल्या भारतात ही घाण पसरण्याआधी, भारतातील मुली आणि किशोरवयीन मुलांच्या कल्याणासाठी मातृ - पितृ पूजन करावे असे वातावरण निर्माण झाले पाहिजे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. 'मदर-फादर पूजेचा दिवस' हा खऱ्या प्रेमाचा दिवस आहे. मातृ-पितृ पूजन दिन निमित्त जिल्हाभर माता पिता पूजन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. अकोला-पातुर रोड स्थित असलेल्या आसाराम बापू आश्रमाच्या संयोजनातून मातृ-पितृ दिन निमित्त पंधरवाडा अकोला जिल्ह्याभर साजरा करण्यात येत असून यात जिल्ह्यातील विविध शाळेमध्ये हा नैतिक व संस्कारशील उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संत आसाराम भक्त मंडळाच्या वतीने देण्यात आली. भारतीय संस्कृतीत माता पिता यांना साक्षात भगवंतांचे स्थान देण्यात आले आहे. माता पिता हे प्रथम गुरू आहेत. त्यांची सातत्याने पूजा होने ही आपली संस्कृती आहे. मातापित्याची सेवा करणे हे श्रावण बाळासारखे आपले कर्तव्य आहे. हे हेरून गुरुदेव आसाराम बापू यांनी संस्कृतीतून नाहीशी होत असणारी ही परंपरा अबाधित सुरू केली. वेलेन्टाइन च्या नावावर होत असणारे सांस्कृतिक व नैतिक अधःपतन बापूनी या माध्यमातून थांबवून त्या जागी प्राचीन परंपरा असणारे माता पिता पूजन हा उपक्रम जिल्ह्याभर राबविण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले.
1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील विविध शाळेमध्ये मातृ पितृ दिनाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामधे जय बजरंग विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय चांन्नी ता. पातूर जिल्हा अकोला येथे प्रा. गजानन गाडगे व एस. आर. गोपणारायन यांच्या साह्याने पार पाडण्यात आले. तसेच जि.प. वरिष्ठ प्राथ शाळा माझोड केंद्र कापशी रोड अकोला येथे काळके सर, पालक वर्ग आणि चतरकर मॅडम, कुलकर्णी मॅडम, भटकर सर, विशाल खंडारे, आणि सीताराम अटायकर हे उपस्थित करण्यात आला. श्री. कैलास विद्यालय, सिंदखेड ता. बार्शिटाकळी जि. अकोला. येथे सुध्दा संत श्री. आसारामजी बापू आश्रम चांदुर फाटा पातूर रोड अकोला यांच्या मार्फत मातृ पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. दरम्यान मार्गदर्शक प्रा. मालतीताई रौंदळकर आणि सूत्रसंचालन गडवाले सर यांनी केले. प्रमुख उपस्तीति शाळेचे मुख्याध्यापक झाडे सर, पालक वर्ग व संस्थेचे अध्यक्ष चिंतामण वैद्य, रमेश इंगळे कोषाध्यक्ष मिलिंद वानखडे, भिमसागर वाणखडे, आर. के. लटये व सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी यांना शालेय साहित्याचे (Exam Pad )मोफत वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय व स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी दि 14 फेब्रुवारी रोजी वेलेन्टाइन च्या ऐवजी मातृ पितृ दिन उत्सव कार्यक्रम राबवून मातृ-पितृ दिनाचे महत्त्व, आजच्या बालक व युवा पिढीला मातृ पितृत्व दिनाचे महत्व सांगण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी ॲड. राजेश रमेश इंगळे, प्रा. मालतीताई प्रमोद रौंदळकर,बुद्धभूषण गावंडे,विशाल खंडारे,सौ मंडपू आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या