Ticker

6/recent/ticker-posts

ईश्वराने काम करण्याची संधी दिली, संधीचे सोने करा - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ईश्वराने काम करण्याची संधी दिली, संधीचे सोने करा - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


अकोला- विश्व नेते आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा विराजमान होण्याचा निर्धार देशातील 140 कोटी जनतेने घेतला आहे या मध्ये आपला खारीचा वाटा हवा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागा अनेक राष्ट्रभक्त भारतीय जनता पक्षाला सत्तारूढ करण्यासाठी कटिबद्ध आहे आपण देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपल्याला पक्ष ईश्वराने काम करण्याची संधी दिली आहे या संधीचे सोने करा असे आवाहन अकोला जिल्हा पालकमंत्री व राज्याचे महसूल पशु संवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले बाळापुर रोड येथे आयोजित भारतीय जनता पार्टी अकोला महानगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते बैठकीचे अध्यक्ष किशोर मागटे पाटील हे होते तर मंचावर विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे विजय अग्रवाल तेजराव थोरात जयंत मसने अनुप धोत्रे, नारायणराव गव्हाणकर बळीराम सिरस्कार वसंतराव खोटरे डॉक्टर रणजीत पाटील, वाशिम भाजपा जिल्हाध्यक्ष श्याम बडे वैशाली निकम चंदाताई शर्मा माधव मानकर कृष्णा शर्मा वसंत बाचू का एडवोकेट देवाशिष काकड,सजयगोटफोडे, आधी विराजमान होते. यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हेल्मेट सक्ती करणार नाही यासंदर्भात पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात येणार आहे व नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे अभिवचन त्यांनी दिले या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी लक्ष वेधून अकोला शहरात दुचाकी वाहन हे 35 च्या वर चालत नाही व शहरातील विस्तार हा कमी असून ज्या भागात एक्सीडेंट होते त्या भागाचा विश्लेषण करून त्या भागात हेल्मेटचा शक्ति करण्यात यावी अशी मागणी केली त्या मागणीची तरी दखल घेऊन या संदर्भात पोलीस विभागाला सूचना देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार विकास आसोबत संस्कृती संवर्धनाचा काम करत आहे या कार्यक्रमाला आपण सहकार्य करावा याची आपण भागीदार व्हावे अशीही यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोटेकर यांनी आगामी कार्यक्रम संदर्भात माहिती दिली तसेच पक्षाने दिलेले कार्यक्रम याचा विस्तारीकरण करा नमो ॲप सरल अॅप तसेच नमो चषक तसेच युवाशक्ती आणि मातृशक्तीच्या कार्यक्रमात संदर्भात व संघटना बाबीचा त्यांनी आढावा घेऊन देशामध्ये पुन्हा 400 के पार भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी पाठवण्याच्या दृष्टीने संकल्पित होऊन अकोल्यात 62 टक्के पेक्षा जास्त मतं मिळवण्याच्या दृष्टीने कामाला लागा असे आवाहन केले.


त्यांनी यावेळी संघटनात्मक आढावा घेतला तर आमदार रणधीर सावरकर यांनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा हनुमान असून त्यांनी ठरवलं तर सर्व काम यशस्वी करू शकतो कार्यकर्त्यांनी मनभेद विसरून राष्ट्र निर्माणच्या संकल्पसाठी विश्वातील सगळ्यात पार्टीचे व जगातील परमानंद देणारा प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करा देशभरातील लोक साजरा करत असताना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मागे राहणार नाही असा त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी सोशल मीडियाचा महत्व प्रिंट मीडियाचा महत्त्व तसेच वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी पवन महाले संतोष शिवरकर नारायणराव गव्हाणकर चंदा शर्मा वैशाली निकम विजय अग्रवाल अनुप धोत्रे किशोर पाटील यांनी वेगवेगळ्या विषयावर तर राम जन्मभूमी आंदोलनाविषयी माजी नगरसेवक व भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवाशिष काकड तर प्रास्ताविक जयंत मसने यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज गुरुगोविंद सिंग अहिल्याबाई होळकर ज्योतिबा फुले शाहू महाराज भारत माता पंडितदीन दयाल उपाध्याय शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व द्विपर्जनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली मीन व शहरातील पदाधिकारी मंडल पदाधिकारी विविध आघाडीचे प्रमुख तेराशे सात पदाधिकारी उपस्थित होते

श्रीराम कार सेवकांचा सन्मान करणे त्यांच्या कार्याला नमन करणे कर्तव्य- अनिल भाऊ मानधने


अकोला- राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक आर्थिक क्षेत्रासोबत मानवतेच्या कार्यामध्ये सातत्याने पन्नास वर्ष समाजाचा व्रत घेऊन संस्कृती संवर्धनाचा समाजाला एकत्रित करण्याचे काम करणारे श्रीराम कार सेवकांचा सन्मान करणे त्यांचा आदर्श नवीन पिढीला माहिती व्हावा त्यांच्या त्या गबलिदान तपस्या ची माहिती व्हावी यासाठी श्री जानकी वल्लभ सरकार धर्मात संस्था व स्वर्गीय अरुण भाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कार्याला नमन करणे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन अनिल भाऊ मानधने यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आघाडीचे महाराष्ट्राचे नेते मदनलाल शंकरलालजी खंडेलवाल सातत्याने चार पिढीपासून समाजाची सेवा करत आहे व कार सेवेमध्ये सक्रिय भाग घेतला त्यांचा स्वागत करण्यात आला तसेच माजी आमदार गजानन दालु गुरुजी, राजू दयाचंद अग्रवाल, अकोला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघ चालक हेमंत उत्तमराव थोरात त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्वागत करण्यात आला यावेळी अनिल मानधने गिरीराज तिवारी गिरीश जोशी हितेश चौधरी संजय जीरापुरे निलेश निनोरे गजानन धनोकार उमेश सटवाले, उमेश गुजर मंगला जीरापुरे पुष्पा वानखडे विलास अनासने प्रशांत लोहिया आधी प्रामुख्याने उपस्थित होते ‌

पालकमंत्री विखे पाटील यांनी नमो चषक दुर्घटनेतील अपघात ग्रस्तांची घेतली भेट

अकोला पीडित वंचितांना आधार देणे तसेच दुर्घटना चा राजकारण न करता त्यांची प्रकृती चांगली व्हावी या दृष्टीने ताबडतोब घटनास्थळापासून दवाखान्याची व्यवस्था करणार व त्यासाठी स्वखर्च तयारी करणारे आमदार हरीश पिंपळे यांचे कार्य चांगले असून नमो चषकच्या वेळी दगड पारवा येथे गॅलरी पडल्यामुळे जखमी झाल्याची विचारपूस करून डॉक्टर अभय पाटील डॉक्टर रावणकर डॉक्टर कैलास मुरारका यांच्या दवाखान्याला भेट देऊन चांगली आरोग्य सेवा प्राप्त होऊन त्यांच्या प्रकृती चांगली व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार पिंपळे व त्यांचे सहकारी व अकोला जिल्हा भाजपाचे नेतृत्व आमदार रणधीर सावरकर आणि तातडीने दखल घेऊन आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला अभिप्रेत कार्य केल्याचे प्रतिपादन करून रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्याचा खर्चाचा झाला धनादेश त्यांनी त्यामध्ये आपला योगदान देऊन हरीश पिंपळे यांच्या माध्यमातून दिले यावेळी त्यांनी अजबराव जाधव गवई संदीप भागवत गणेश जाधव उल्हास चव्हाण विलास जाधव संतोष पवार श्रीराम चव्हाण चेतन राठोड संजय राठोड विठ्ठल काळे आदित्य राऊत दशरथ जाधव विनायक पवार ओमकार पांडे, ताराचंद राठोड आकाश पवार युवराज चव्हाण कान्हो सिंग काळे कानू सिंग आले केशव जाधव अजबराव गंगावणे यांची भेट घेतली यावेळी डॉक्टर चव्हाण डॉक्टर अभय पाटील हॉस्पिटल डॉक्टर मुरारका हॉस्पिटल इथे उपचाराबद्दल नामदार पालकमंत्री अकोल्याच्या दौऱ्यावर आल्यावर विचारपूस केली यावेळी कोमल तायडे रितेश समाजकर भूषण कोकाटे कमलाकर गावंडे अशोक राठोड आधी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी पिंपळे यांच्यासोबत होते




हाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या