आशा व गट प्रवर्तक यांचा एल्गार आज चटणी भाकर आंदोलन
दिनाक 17 जानेवारी 2024
अकोला जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक यांनी चटणी भाकर आंदोलन केले या आंदोलन द्वारे शासनाला सांगू इच्छितो की आमच्या चटणी वर तेल नाही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून आशा व गट प्रवर्तक यांच्या मानधन वाढ Gr लवकरात लवकर काढावा कामाचा अतिरिक्त बोजा वाढला मानधन मात्र तुटपुंज्या दिला जात आहे. विविध मागण्यांबाबत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले.
बाईट- संध्या पाटील, आशा
कृती समिती च आंदोलनात सी आय टी यू च 1100 आशा सहभागी झाल्या असून आज कामगारांची व्यथा शासनाला दाखवण्या साठी ठेचा भाकर आंदोलन करण्यात आले दिनाक 18 ऑक्टबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत संप केला त्या आशा व गट प्रवर्तक यांना दिवाळी बोनस 2000
आशा ना 7000 मानधन वाढ
गट प्रवर्तक यांना 10,000 मानधन वाढ जाहीर केली पण शासन निर्णप्रक्रियेत विलंब होत आहे तरीही शासन निर्णय लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा ही विनंती आमच्या ठेक्यावर तेल व आमच्या ताटातील डाळ रोटी भाजी आमच्या पदरी द्यावी हा शासनाला संदेश देत आहोत. यावेळी जिल्हा सचिव, कॉम संध्या पाटील, अध्यक्ष राजन गावंडे, कोषाध्यक्ष रुपाली धांडे, उपाध्यक्ष संतोष चीपडे आणि आशा उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या