राजकिय पक्षांनी कलावंताच्या क्रांतिकारी धरणे आंदोलनाला पाठींबा द्यावा. -संजय कडोळे
वाशिम : खऱ्या अर्थाने साहित्यीक,कलाकार, लोककलावंत हे केन्द्र व राज्यशासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा प्रचार प्रसार आणि समाजातील अनिष्ट प्रथा, हुंडाप्रथा, निरक्षरता,अंधश्रद्धा,व्यसनमुक्ती निर्मूलन,बेटी बचाव बेटी पढाओ, वृक्षारोपण,देहदान,रक्तदान बद्दल सामाजिक जनजागृती करीत असतात.शिवाय आपल्या क्रांतिकारक देशभक्त महापुरुषांचा इतिहास आपल्या लिखाणातून,कथा-किर्तन प्रवचन-शाहीरी-पोवाडे-लोकगीते -काव्य-भिमगीते,गोंधळ जागर-दंढार-कलापथक -कव्वाली-लोकनाट्य-नृत्यनाट्यामधून,आपल्या समाजाचे मनोरंजनासोबत समाज प्रबोधन करीत असतात.निवडणूक काळातही विविध राजकिय पक्ष हे अनेक ठिकाणी किर्तनकार -प्रवचनकार-शाहिर-भिमशाहिर -व्याख्याते-भजनीमंडळे आदींचे, नागरीकांची गर्दी खेचणारे कार्यक्रम आयोजीत करून आपला स्वार्थ साधून घेत असतात.परंतु एकदा का निवडणूका संपल्या की त्यांना किर्तनकार,प्रवचनकार,व्याख्याते लोककलावंत यांचा विसर पडतो. समाजप्रबोधकार, साहित्यीक,किर्तनकार प्रवचनकार,शाहिर ,भिमशाहिर, लोककलावंत हे सहसा तळागाळातील, दारिद्रयरेषेखालील,ग्रामिण भागातून आलेले असतात.
त्यांच्याही मागण्या किंवा समस्या सोडविणे हे शासना बरोबरच प्रत्येक राजकिय पक्षांचे, राजाकिय नेत्यांचेही कर्तव्य असते.त्यामुळेच वृद्धापकाळी लोककलावंताना मानधन मिळावे. ; सद्यस्थितीत मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनात महागाईला अनुसरून मानधन वाढ व्हावी. ; गेल्या पाच वर्षापासून स्थगीत असलेल्या, जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीची विद्यमान पालकमंत्री महोदयांनी पुनर्रचना करून,पाच वर्षापासून मानधना करीता देण्यात आलेले कलावंताचे प्रलंबीत प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन कलावंताना दरमहा मानधन सुरु करण्यात यावे.मृतक कलावंताच्या वारसदार यांना वारसाहक्काने मानधन मिळावे ह्या हक्काच्या रास्त मागण्यांकरीता कलावंताचे क्रांतिकारी धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगण वाशीम येथे बुधवार दि. 24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:00 ते 05:00 ह्या वेळेत होणार आहे.करीता ह्या आंदोलनाला राजकिय पक्षांचा पाठींबा मिळावा म्हणून जिल्ह्यातील सर्वच राजकिय पक्षांनी आणि राजकिय नेत्यांनी कलावतांच्या क्रांतिकारी धरणे आंदोलनाला पाठींबा देऊन विविध मागण्यांबाबत पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी मॅडम यांचेशी चर्चा करून, जिल्ह्यातील वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर हलाखीचे जीवन जगणाऱ्या कलावंताना न्याय मिळवून देण्याची विनंती, जिल्ह्यातील कलावंताच्या वतीने,विदर्भ लोककलावंत संघटनेने अध्यक्ष (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत) संजय कडोळे यांनी सर्व राजकिय पक्षांना केली आहे.
गहाळ झालेले 23 मोबाईल मालकाला परत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई
कारंजा (लाड) : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून कारंजा तालुक्यातील 23 जणांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारीवरून सी. ई. आय. आर. पोर्टल वरून शोध घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांच्या हस्ते तक्रारदारास दि. 17 जानेवारी रोजी परत करण्यात आले. परत करण्यात आलेल्या 23 मोबाईलची किंमत अंदाजे दोन लाख तिस हजार रुपयांच्या जवळपास होती. या संदर्भात मोबाईल हरवलेल्या नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली त्यावरून CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलचा शोध घेण्यात आला. या कार्यावाही मध्ये सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुशन गावंडे,पो.काॅ.विजय गंगावणे पो.काॅ.वैभव गाडवे,म.पो.काॅ. पुष्षा मनवर यांनी सहकार्य केले. यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले. मोबाईल गहाळ झाल्यास संबंधित पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवावी.असे आवाहन सायबर पोलिस स्टेशन वाशिमच्या वतीने करण्यात आले.असे वृत्त शहर पो.स्टे. कडून मिळाल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
0 टिप्पण्या