Ticker

6/recent/ticker-posts

पेट्रोल पंप वर उसळली अचानक गर्दी, पंप बंदची पसरली अफवा

पेट्रोल पंप वर उसळली अचानक गर्दी, पंप बंदची पसरली अफवा


अकोला: केंद्र शासनाने मोटर वाहन अधिनियम अंतर्गत तीन कायदे पारित केले त्यामध्ये हिट अँड रन अंतर्गत दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड चे प्रावधान करण्यात आले. या कायद्याविरोधात मोटर वाहन चालकाच्या सर्व संघटनांद्वारे चक्काजाम आंदोलनाचे आवाहन करण्यात आले.  त्या अंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम सुद्धा करण्यात आले. यामध्ये पेट्रोल पंप, टँकर चालक सुद्धा समाविष्ट असल्याचा अफवा पसरविण्यात आल्या त्यामुळे पेट्रोल पंप बंद राहणार असा समज नागरिकांनी घेतल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी उसळली आहे.



यासंदर्भात पेट्रोल पंप चालक यांना विचारणा केली असता त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितले. अशी कोणत्याही प्रकारच्या सूचना नसून कोणत्याही प्रकारचा बंद पुकारण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या