धक्कादायक! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी युवकाची हत्या
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कृषी नगर परीसारात युवकाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या झालेला युवक हा जळगाव जामोद, तरोळा येथील रहिवसी असुन विशाल मधुकर झाडे वय वीस वर्षचा आहे. सदर मुलाची चाकूने भोसकून हत्या केली आहे. सिव्हिल लाईन पोलीस आणि SDPO घटना स्थळी दाखल होऊन मृतदेहावर पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.
पोटावर गंभीर चाकूचे घाव असलेल्या विशालला स्थानिक नागरिकांनी तातडीने अकोल्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या कृषी नगर संकुलात मिरज सिनेमासमोर एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता.त्यानंतर काही दिवसांनी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 टिप्पण्या