Ticker

6/recent/ticker-posts

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, चौघेविरुद्ध गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, चौघेविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतीनीधी- नासीर शेख 
पातूर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत शिरपूर परिसरात गेल्या काही दिवसापासून जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन, बीट जमदार सुधाकर करवते,आदींनी  मंगळवार दि.१६ जानेवारी रोजी धाड टाकली असता,शिरपूर येथील शेख रफीक शेख रशीद, याला जुगार अड्डा सुरू असल्याच्या ठिकाणाहून रंगेहाथ पकडले, तसेच शिरपूर येथील शरीफ खान, व खेट्री येथील संदीप राजाराम लांडे, व माजी ग्राम पंचायत सदस्य  शेख समीर शेख चांद, असे चौघेविरुद्ध चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी धाड टाकताच जुगार खेळणारे संदीप राजाराम लांडे,ग्राम पंचायत सदस्य शेख समीर शेख चांद, शरीफ खान या तिघांनी पळ काढला होता,पोलिसांनी शेख रफीक याला ताब्यात घेऊन  घटनास्थळावरून मोबई व रोख जप्त करण्यात आले. 


राजकीय पुढाऱ्यांची दुहेरी भूमिका
राजकीय पुढार्‍याकडून अवैध धंदे बंद करण्यासाठी आवाज उठवल्या जाते, मात्र आपला कार्यकर्ता पकडला गेला की, त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला जातो,या जुगार कारवाईत सुद्धा राजकीय पुढार्‍यांनी आपल्या कार्यकर्त्याचे नाव कमी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु प्रयत्न अयशस्वी ठरले असून, चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला  आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या