सुजातदादा आंबेडकर ह्यांचे हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
सुजातदादा आंबेडकर ह्यांचे हस्ते
बाळापूर तालुक्यातील व्यायामशाळा लोकार्पण तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. विस्तारित औष्णिक विज प्रकल्प उभारण्याची जोपर्यंत नव्याने घोषणा होत नाही, तो पर्यंत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन सुरूच राहणार असून यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वंचितची तयारी राहणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिला आहे. पारस येथील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. आज पारस येथील रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त 👆 येथे पहा..
बाळापूर दि. २३ विविध भूमिपूजन-
बाळापूर तालुक्यातील
१) रिधोरा येथील
जि प शाळा येथे पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन
२) रिधोरा येथील
बुध्दशासन बुध्दविहार बांधकाम पाहणी
३) व्याळा येथील
डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यायामशाळा लोकार्पण
४) पिंपळगाव येथील
डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यायामशाळा लोकार्पण
५) पारस येथील जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले..
यावेळी प्रा. धैर्यवर्धन पूंडकर, राजेंद्रभाऊ पातोडे, प्रमोद देंडवे, मिलींद इंगळे, प्रभाताई सिरसाठ, श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, आम्रपालीताई खंडारे (जि प सभापती),
संदीप वानखडे, प्रगतीताई दांदळे, सचिन शिराळे, धर्मेंद्र दंदी, निलेश इंगळे,ऍड सुबोध डोंगरे,रुपालीताई गवई, आनंद खंडारे,ऍड प्रशिक मोरे,ऍड मिनल मेंढे,विजय पातोडे, श्रीकृष्ण देवकुणबी उपस्थित होते. संपूर्ण दौऱ्यात वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या