Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाचा वाढता प्रसार, नागरीकांनी आरोग्य सांभाळावे

कोरोनाचा वाढता प्रसार, नागरीकांनी आरोग्य सांभाळावे


 "परत एकदा मास्कसक्ती होण्याची शक्यता." 

प्रतीनीधी- संजय कडोळे
अकोला / वाशिम: नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात तापमानाचा पारा घसरून हवामानात अचानक ऊतार निर्माण होऊन थंडगार वारे वहात असल्यामुळे सद्यस्थितीत नागरीकांना डोके दुखी, हातपाय अंग दुखी, सर्दी पडसा, हिवताप, दमा खोकला, डेंग्यू टायफाईड इत्यादी आजाराच्या तक्रारी ऐकायला येत आहेत.


परिणामी रुग्नालयातील रुग्नसंख्येत अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होतांना दिसत असून आजारांचे प्रमाण वाढलेले आहे..त्यातच परत एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ची निर्मीती झाल्याची चर्चा असून, पुण्या मुंबईकडे कोरोना रुग्न संख्या वाढत असल्याचे आकडे पुढे येत असून, श्रीक्षेत्र पंढरपूर देवस्थानने वारकर्‍यांकरीता मास्कसक्ती केल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.तर बाजूच्या अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्न निघाल्याच्या बातम्या येत असल्याने हा विषय आपल्या गावातील सुजाण नागरिकांनी सुद्धा गांभीर्याने घेणे आवश्यक झाले आहे.म्हणूनच भविष्यात आपल्या गावात परत एकदा नाकाबंदी, जमावबंदी किंवा संचारबंदी येऊ नये.आणि नागरिकांवर वैद्यकिय पथकाच्या नजरकैदेत (क्वारंटाईन) जाण्याची वेळ येऊ नये.म्हणून प्रत्येक नागरिकांनी दक्षता घेऊन, आपआपल्या कुटूंबातील गंभीर रुग्न, दुर्धर आजारग्रस्त, दिव्यांग, लहान बालक,गरोदर स्त्रीया आणि वयोवृद्ध नागरिकांची विशेष काळजी घ्यावी.त्याकरीता डेटॉलने आंघोळ, वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर,गर्दीत जाणे टाळणे,मास्क वापरणे, पिण्याकरीता कोमट पाणी, आयुर्वेदिक काढा,थंडीपासून शरिराचा बचाव इत्यादी काळजी घ्यावी आणि महत्वाचे म्हणजे आजाराची बारिक सारीक लक्षणे आढळताच आपल्या फॅमिली डॉक्टरांकडूनच तपासणी करूनच औषधोपचार सुरू करावा.असे विनम्र आवाहन,करंजमहात्म्य परिवाराचे,दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कारंजेकरांकरीता केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या