Ticker

6/recent/ticker-posts

सीताबाई महाविद्यालयाला नॅक द्वारा अ+ मुल्यांकन प्राप्त

सीताबाई महाविद्यालयाला नॅक द्वारा अ+ मुल्यांकन प्राप्त


दी बेरार जनरल एजुकेशन सोसायटी द्वारा संचालित सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद म्हणजेच नॅक द्वारा अ+ (A+) मूल्यांकन प्राप्त झाले.
नॅक बंगळूर द्वारा ३ सदस्यीय समितीने दिनांक १४ व १५ डिसेंबर ला महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देउन महाविद्यालयाच्या गेल्या ५ वर्षातील शैक्षणिक, सांस्कृतिक, व विविध विद्यार्थीहिताच्या कार्याचा आढावा घेउन त्याचे मूल्यांकन करण्यात आले. सदर समीती मध्ये अध्यक्ष म्हणून तामिलनाडु येथील प्रो. मुनेशचंद्र अधिकारी, तर समन्वयक म्हणून केरळ येथील डॉ सुरेश रंगराजन व सदस्य म्हणून आंध्रप्रदेश येथील डॉ कानिथी श्रिरमलु यांचा समावेश होता. दोन दिवस चाललेल्या पाहणी दरम्यान त्यांनी महाविद्यालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक करुन संस्थेचे व महाविद्यालयाची प्रशंसा केली.


दि बेरार जनरल एजुकेशन सोसायटी चे अध्यक्ष ॲड मोतीसिहजी मोहता, मानद सचिव डॉ पवनजी माहेश्वरी, इंजिनिअर अभिजीत परांजपे, श्री विजय तोष्णीवाल, सी ए विक्रम गोलेच्छा व सर्व कार्यकारिणी सदस्यांसोबत बैठकीत नॅक समीतीने विविध बाबींवर चर्चा करुन संस्थे द्वारा महाविद्यालयाच्या विकासातील भुमिकेचे कौतुक करुन मुलांच्या वसतीगृहा करिता सहकार्याची अपेक्षा व्यक्त करुन शिफारस केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डि सिकची यांनी नॅक टिम ला महाविद्यालयाची संपूर्ण माहिती देउन या संपूर्ण परिक्षेत्रात शिष्यवृत्ती धारकांना निशुल्क प्रवेश देणारे एकमेव महाविद्यालय असल्याचे सांगितले यावेळी डॉ भारती पटनायक यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेटी देउन नॅक समीतीने महाविद्यालयाच्या विविध विभागाद्वारे राबविण्यात येणारे विविध कोर्सेस व विद्यार्थी केंद्रीत कार्यक्रमाची पाहणी केली.
महाविद्यालयाच्या पाहणी दरम्यान सर्व विद्यार्थी व प्राध्यापक महाविद्यालयात उपस्थित होते. यासंपुर्ण प्रक्रियेत महाविद्यालय आइ क्यु ए सी प्रमुख डॉ कौमुदी क्षिरसागर यांनी त्यांना सहकार्य केले. नुकतेच महाविद्यालयाला नॅक च्या मूल्यांकनाचे व दर्जा चे पत्र प्राप्त झाले ज्यामध्ये महाविद्यालयाला अ+ दर्जा प्राप्त झाला ज्याचा सी जि पि ए ३.३३ येवढा मिळाला जो विद्यापीठ क्षेत्रात अ+ दर्जा मिळालेल्या मोजक्या महाविद्यालयात सर्वात जास्त आहे. याबद्दल महाविद्यालयाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या