भारत मुक्ती मोर्चा च्यावतीने पश्चिम विदर्भस्तरीय सत्यशोधक संमेलन अकोल्यात
राष्ट्रीय मूलनिवासी महीला संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुंदा तोडकर यांची राहणार विशेष उपस्थीती
अकोला सत्यशोधक समाज स्थापने मागील उद्देश विचारधारा व आजची प्रासंगिकता अथवा सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन करणे हीच व्यवस्था परिवर्तनाची पूर्व शर्थ, 62 हजार शाळांचे खाजगीकरण व कंत्राटी नोकरी भरती महाराष्ट्र सरकारचे हे दोन्ही जीआर म्हणजे एससी एसटी ओबीसी व धर्म परिवर्तित मूलनिवासी बहुजन समाजाला गुलाम बनवणे ,देशात जातीनिहाय जनगणना करणार नाही. केंद्र सरकार व महाराष्ट्रात जातीनिहाय सर्वेक्षण करून बीजेपी या दोन विधानामागील यंत्राचा विरोधाभास अथवा जर ओबीसी हिंदू आहेत तर शासक वर्ग ब्राह्मण ओबीसीच्या जातीने जनगणनेचा विरोध का करतात, मुसलमानांचे पूर्व हिंदू होते आरएसएस संघचालक मोहन भागवत यांचे विधान किती खरे किती खोटे आदी विषयांवर विस्तृत खल करण्यासाठीं येत्या १०नोव्हेंबर रोजी आबासाहेब खेडकर सभागृहात भारतीय मुक्ती मोर्चा च्या वतीने पश्चिम विदर्भ स्तरीय सत्यशोधक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला उद्घाटक म्हणून संपादक पुरुषोत्तम आवारे पाटील हे असणार आहेत तर विशेष उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ कुंदा तोडकर तसेच सी इ सी सदस्य प्रशांत ठपके , मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पोटोकार, भारत मुक्ती मोर्चा राज्य सदस्य श्याम अवचार,12 बलुतेदार संघटना अकोला जिल्हा कार्याध्यक्ष गजानन वाघमारे हे असणार आहेत.या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून निलेश जळमकार, प्रतापदादा पाटील ,प्रभाकर वानखडे ,अशोक गोळे ,मौलाना बरकत अली हे असतील तर भगवान डाखोरे सुनील कापसे डेव्हिड इंगळे मौलाना कारी मसूद प्रमोद सरदार गणपत गव्हाळे भागवत जाधव आनंद खुळे गजानन दोड संजय दळे बाबा मोहोड विष्णू राऊत भालचंद्र उगले आदींची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती आज आयोजीत पत्रकार परिषदेत ऍड .सारंग निखाळे, मंगला थोरात मॅडम, राहुल वाकोडे, योगेश जायले, सूर्यभान उंबरकर, मुरलीधर पखाले, शाहिद इक्बाल यांनी दिली आहे.
या संमेलनाला फुले, शाहू, आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना अकोलाचे प्रभाकर वानखडे, जिल्हा सचिव आदिवासी अस्मिता संधटना, बुलदाणा. भगवान डाखोरे, मौलाना कारी मसूद अकोला ,विभागीय प्रभारी, बहूजन मुक्ति मोर्चा पश्चिम विदर्भ भागवत जाधव,जिल्हाध्यक्ष,वाशीम संजय ढळे ,अकोला जिल्हाध्यक्ष विष्णू राऊत सुरेश आप्पा कापसे राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय लिगायत मोर्चा,मी महात्मा फुले बोलतोय, एकॉंकीका अभिनेता प्रमोद सरदार , जिल्हाध्यक्ष आनंद खबुछे , राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, वाशीम, बाबा मोहोड राष्ट्रीय किसान मोर्चा, अमरावती, भालचंद्र विश्वनाथ उगले (देऊळगाव) आदींसह अनेकांची उपस्थित राहणार आहेत. या वैचारिक संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ऍड .सारंग निखाळे, मंगला थोरात मॅडम, राहुल वाकोडे, योगेश जायले, सूर्यभान उंबरकर, मुरलीधर पखाले, शाहिद इक्बाल यांनी केलें आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या