भव्य दिव्य शंकर पटाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांच्या हस्ते
तालुक्यातील ग्राम कंझरा जागेश्वर येथे बैलांची ऐतिहासिक शंकरपटाचे आयोजन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
अकोला प्रतिनिधी: संतोष माने
तालुक्यातील ग्राम कंझरा जागेश्वर येथे सोमवार दिनांक 6 ते 8 नोहेम्बर रोजी भव्य ऐतिहासिक शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. मागील अनेक दिवसांपासून बैलगाडा शर्यतीला बंदी होती. आता न्यायालयाने अशा शर्यतींवरील बंदी उठवली आहे. सध्या राज्यात ठिकठिकानी बैलगाडा शर्यती मोठ्या थाटामाटात भरवल्या जात आहेत. पण ही 300 वर्षाची परंपरा असलेली विदर्भातील पारंपारिक स्पर्धा म्हणजे शंकरपट. बैल जोडीची शर्यत म्हणजे शंकरपट. या खेळामध्ये काही भागात एका वेळेस एक गाडी किंवा काही भागात दोन बैलगाड्या सहभागी असतात. यामध्ये गाडीवर बसलेला चालक हा गाडी चालवत असतो. अंतीम सीमारेषेजवळ पंच कमेटी बसलेली असते. जि बैलजोडी सर्वात कमी वेळेत अंतर पार पाडेल, त्यांना प्रथम क्रमांक दिला जातो. ही स्पर्धा सेकंदावर चालते. विदर्भातील अकोला अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील बरेचशे शेतकरी या खेळासाठी आपली बैलजोडी मोठ्या उत्साहात तयार करत असतात. हंगामातील वार्षीक यात्रांना शंकरपट ही स्पर्धा भरवली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील खेळला जानारा छकडी शर्यत आणि शंकरपट मधील गाडी मध्ये खुफच फरक आहे. दोन्हीही शर्यतीच्या प्रकारामध्ये शर्यतीमध्ये गाडीवर मानुस बसलेला असतो आणि बैलांना चालवत असतो. छकडी शर्यतीमध्ये चालक हा गुडघ्यावर तोल सांभाळून गाडीमध्ये बसत असतो. पण शंकरपटामध्ये चालकाला बसायला वेगळी जागा असते. जसे की दोन चाकांना जोडणारा जो “आक ” म्हणजे दोन चाकाला जोडणारा मधला लोखंडी रॉड असतो .त्यावर बसण्यासाठी चालकाला खास व्यवस्था असते.
तरीपण या भव्य ऐतिहासिक शंकरपटाचे उद्घाटन दिनांक 6 नोहेम्बर 2023 रोज सोमवारला सकाळी 10:00 वाजता उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे व प्रमुख पाहुणे पशुसंवर्धन सभापती मोहन रोकडे यांच्या हस्ते भव्य शंकर पटाचे उद्घाटन पार पडले.यावेळी शंकरपटाचे महर्षी गंगारामजी कांबे,श्रीकृष्ण बोळे,संगीत कांबे, दिवाकर काटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले अ गटात प्रथम क्रमांक लक्षात या बैलाने पटकावला आहे साहेबराव पाटील हिवरा संगम तालुका पुसद जिल्हा यवतमाळ द्वितीय क्रमांक रामप्रसाद राठोड बैलाचे नाव गोविंदा राहणार मध्य प्रदेश क गटात हिवरा रोहिला वाशिम भारत जाधव साजेगाव जिल्हा यवतमाळ यांना बक्षीस देण्यात आले पंच कमिटी नाना गोसावी तेजस मनोहर शिवम शेजोकार राजेश पायगन गणेश भगत अन्सार शहा अनिल गिरी आनंद गोसावी नंदकिशोर पायगन पोलीस पाटील जितेंद्र लांडे आदींची उपस्थिती होती.ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.आयोजक मंडळ व पटप्रेमी बांधव यांनी संपूर्ण नियमाचे पालन करून शंकरपट स्पर्धा शांततारीत्या यशस्वीपणे पार पाडण्यात मोलाचे योगदान दिले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या