Ticker

6/recent/ticker-posts

अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बँकेचे विमा कवच व इतर सुविधा 

अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बँकेचे विमा कवच व इतर सुविधा 


शंभर टक्के अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वाशिम व अकोला जिल्ह्यातील अंशतः अनुदानित पगारदार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अपघाती विमा कवच व इतर सुविधा प्रदान करा.- मा. किरण सरनाईक, शिक्षक आमदार, अमरावती विभाग.


---------------------------------------------
एक महिन्याच्या आत निर्णय घेऊ.- मा. डॉ. संतोषदादा कोरपे, अध्यक्ष,दि. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अकोला.
---------------------------------------------


दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यामधील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगाराचे खाते आहेत. पगारदार खातेदारांना अपघात विमा, ओडी कर्ज अशा अनेक सुविधा बँके मार्फत दिल्या जातात.  मात्र अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत कर्मचाऱ्यांना हे लाभ मिळत नाहीत. यासंदर्भात मा.श्री किरण सरनाईक,शिक्षक आमदार, अमरावती विभाग यांनी दि. 20 ऑक्टोबर रोजी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष श्री संतोष दादा कोरपे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा अपघाती विमा,ओडी कर्ज मर्यादा वाढवून देण्याची मागणी केली होती. आज दि. 13 नोव्हेंबर 2023 रोजी अकोला येथे श्री कोरपे साहेब तथा व्यवस्थापकीय संचालक श्री वैद्य साहेब यांची भेट घेऊन वरील मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यादरम्यान  श्री सरनाईक साहेबांनी अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण प्रदान करणारा शासन निर्णयाचा पुरावा दिला. त्यामुळे असा कर्मचारी अतिरिक्त झाल्यास त्यांची सेवा समाप्त होणार नाही. त्यामुळे वरील कर्मचाऱ्यांना हे लाभ देण्याची मागणी केली.  डॉ.संतोषदादा कोरपे यांनी शासन निर्णय यापेक्षा मला आ. किरण सरनाईक यांचा शब्द महत्त्वाचा आहे. असे उद्गार काढले व एवढ्या तळागाळात जाऊन काम करणारा एकमेव व  पहिला आमदार मी पाहिला असे मत व्यक्त केले. तसेच या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देत पुढील एक महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मा.श्री संतोषदादा कोरपे यांनी दिले. यावेळी विनाअनुदान कृती समितीचे वाशिम जिल्हाध्यक्ष प्रशांत कव्हर सर,  दिगंबर गुडघे सर,अकोला जिल्हा कृती समिती अध्यक्ष सुधाकर वाहूरवाघ, विजुक्ताचे संजय देशमुख, गणेश ढोरे, पियुष तीरुख, प्राचार्य नवघरे, श्रीरंग भदे, असिमोद्दीन सर, शमशेर खान सर, डॉ.के बी देशमुख सर अकोला जिल्हा अमरावती विभागीय शिक्षक संघ अध्यक्ष दीपक बिरकड सर इ. कर्मचारी उपस्थित होते.
---------------------------------------------


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या