राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दिवाळीच्या दिवशी राऊत परिवारावर दुःखाचा डोंगर
राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक सहावर वणी रंभापुर जवळ आज दुपारी चारच्या दरम्यान धुचाकी आणि बसचा अपघात झाला. यामध्ये निपाना येथील 19 वर्षीय युवती ही जाग्यावर ठार झाल्यामुळे संतप्त जमावाने महामार्ग रोखून धरला होता. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वणी रंभापुर जवळ आज दुपारी चारच्या दरम्यान बोरगाव मंजू वरून मूर्तिजापुर दिशेने येत असलेली दुचाकी गाडी ही वनीरंभापूर थांब्यावर उभी असताना मागून येणाऱ्या भरधाव हिंगणघाट आगरच्या अकोला हिंगणघाट गाडी क्रमांक एम एच १३ सी यु ८१७८ या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात निकिता चंद्रकांत राऊत वय २१ रा निपाना तिचा मृत्यू झाला तर दुचाकी चालक चंद्रकांत दयाराम राऊत रा. निपाना हे गंभीर जखमी असून यांना अकोला येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या ठिकाणी नागरिकांनी या अगोदर सुद्धा भुयारी मार्गाची मागणी केली होती या ठिकाणी चौफुली असून निपाणा जाण्यासाठी हा महामार्ग खूप महत्त्वाचा आहे महामार्गाच्या चुकीच्या धोरणामुळे येथे आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संतप्त जमावाने महामार्ग रोखून धरला होता. यामध्ये अकोला व मुर्तीजापुर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशन, माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
0 टिप्पण्या