Ticker

6/recent/ticker-posts

मतदार नोंदणी करून प्रत्येक जागृत नागरिकांनी सहकार्य करावे- आ. सावरकर 

मतदार नोंदणी करून प्रत्येक जागृत नागरिकांनी सहकार्य करावे- आ. सावरकर 



अकोला: लोकशाहीमध्ये मतदार राजा असून मतदारांनी आपले नाव नोंदणी अवश्य करावी व आपला हक्क सिद्ध करण्यासाठी 27 ऑक्टोंबर ते नऊ डिसेंबर पर्यंत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या अभियानाला सहकार्य करावे तसेच चार व पाच नोव्हेंबर 25 व 26 नोव्हेंबर रोजी विशेष मध्ये आपले नाव नोंदणी करावी तसेच आपल्या नावामध्ये दुरुस्ती असेल ती दुरुस्ती करावी आपल्या परिसरातील आजूबाजूतील मतदार नोंदणी करून लोकशाहीतील महत्त्वाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक जागृत नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली. 

मा अजित कुंभार सर(भा प्र से) 👆 जिल्हाधिकारी यांचे मतदार जनजागृती संदर्भात अकोला आकाशवाणी केंद्रावरून अकोलेकरांना केले आवाहन (आजपासून पुढील पाच दिवस सायंकाळी 8 वाजता अवश्य ऐका)


केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग निवडणुकीमध्ये मतदारांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असतात छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा राजस्थान निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी आज ठिकठिकाणी जागरण रॅलीकाढून जनजागृतीचे कार्य केले असून केवळ गप्पांचा बाजार न करता आपण आपल्या घरातील अठरा वर्षावरील तसेच आपल्या परिसरातील नागरिकांची नावे नोंदणीसाठी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन नाव नोंदणी करावी तसेच आपल्या नावामध्ये दुरुस्ती असेल ती दुरुस्ती करण्याच्या अभियानामध्ये सहकार्य सह कार्य करावे मतदान कार्ड हे महत्त्वाचे असून यासाठी सर्व नागरिकांनी व भाजपा कार्यकर्ते तसेच सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा तसेच सहकार्यासाठी भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते सजत असून आपल्या परिसरातील नागरिकांनी भाजपा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपले नाव नोंदणी करावी अशी आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या