Ticker

6/recent/ticker-posts

प्रलंबित टप्पा अनुदान विषयावर मंथन, निर्धार सभा संपन्न

प्रलंबित टप्पा अनुदान विषयावर मंथन, निर्धार सभा संपन्न


आज 2 सप्टेंबर रोजी स्थानिक बि. आर. हायस्कूल अकोला येथे म. रा.कायम विना अनुदानित शाळा कृती समिती अमरावती विभागाच्या वतीने अकोला जिल्ह्य़ातील प्रलंबित टप्पा अनुदान विषयावर निर्धार सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जमीर पटेल होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. संजय देशमुख, अब्दुल गणी सर, बाळकृष्ण गावंडे सर, विनोद इंगळे सर असीमोद्दीन सर, सकलेन सर, शोएब सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


टप्पा अनुदान पात्र शाळांना अनुदान मिळण्यासाठी होत असलेल्या दिरंगाई मुळे शिक्षकासह प्रमुख उपस्थितानी या सभेत संताप व्यक्त केला व संघटनेने काही तरी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार मुंबई येथे आझाद मैदानावर पुढील आठवडय़ात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे ठरले. या आंदोलनात अकोला जिल्ह्य़ातील सर्व प्रलंबित पात्र टप्पा वाढ शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 100 टक्के उपस्थित राहून आंदोलन करण्याचा निर्धार केला.
लवकरच आंदोलनाची तारीख कळविण्यात येणार आहे. त्यामुळे या आरपारच्या लढाईत सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व उपस्थितांनी केले आहे. अशी माहीती म. रा.कायम विना अनुदानित शाळा कृती समिती अमरावती विभागाचे एस. के. वाहुरवाघ यांनी पत्रकाद्वारे दिली. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या