Ticker

6/recent/ticker-posts

गोतीर्थ संरक्षण तीर्थ गौरक्षण संस्था येथे भागवत सप्ताह

गोतीर्थ संरक्षण तीर्थ गौरक्षण संस्था येथे भागवत सप्ताह


अकोला
पितृपक्षामध्ये मोक्ष मिळून देण्यासाठी तसेच अकोल्याच्या इतिहासात प्रथमच गोमाताच्या सानिध्यात भागवत सप्ताह ब्रज रसिक उमेश उर्फ डब्बू शर्मा यांच्या मधुर वाणी 5 ऑक्टोंबर ते११ ऑक्टोंबर पर्यंत बालाजीला साक्षी ठेवून गोतीर्थ संरक्षण तीर्थ गौरक्षण संस्था येथे होत असून या निमित्ताने मंडप भूमिपूजन गोसेवा दीपक भरतिया, एडवोकेट महेंद्र पुरोहित पुरुषोत्तम खंडेलवाल किशोर खंडेलवाल शरद मिश्रा सत्यनारायण जाजू वल्लभदास गांधी विनोद बंसल पुरुषोत्तम श्रावगी विजय राठी जयप्रकाश अटल संजय हेडा एडवोकेट सुभाष हेडा अशोक छान गाणी अनिल सोनी अशोक मानधने नटवरलाल पुरोहित गिरीश लड्डा द्वारकादास चांडक कृष्णा बजाज यांच्या शुभहस्ते, वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने संपन्न झाले.


संगीतमय ब्रज रसिक उमेश शर्मा व नेतन शर्मा यांच्या मधुर वाणी गोमाताच्या सानिध्यात पूर्वजांना मोक्षदायी व प्रसन्न करण्यासाठी करण्यासाठी आनंददायी कल्याण , तसेच संस्कृती संवर्धन कार्यक्रम सुप्रभात सत्संग मंडळ च्या वतीने गौरक्षण संस्थेच्या मदतीने एक आगळावेगळा कार्यक्रम राज राजेश्वर नगरीमध्ये होत आहे गुरुवार 5 ऑक्टोंबर रोजी कार्यक्रम सुरू होऊन 11 नंबर रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजता पर्यंत हा कार्यक्रम होणार असून भागवत महात्म्य गोकर्ण वाक्य सुखदेव आगमन सक्ती चरित्र ध्रुवचरित्र जड भरत चरित्र परला चरित्र वामन अवतार राम जन्मोत्सव श्रीकृष्ण जन्मोत्सव नंद महाउत्सव कृष्ण लीला गोवर्धन लीला छप्पन भाऊ रुक्मणी उत्सव सुदामा चरित्र कथासार श्रीमद् भागवत कथा पूर्ण हवन हे कार्यक्रम गुरुवार 12 कुंभ रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे मानव कल्याणदायी व पितरांना प्रसन्न करणाऱ्या या भागवत कथेमध्ये गोमातेच्या सेवेसाठी आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे व सातत्याने गौरक्षण संस्था पासून प्रभात फेरी प्रभू राम स्मरण गेल्या पंचवीस वर्षापासून सुप्रभात सत्संग मंडळ करत असून वेगवेगळे कार्यक्रम च्या माध्यमातून भजन संकीर्तन तसेच राम जन्मोत्सव वेगवेगळे उत्सव साजरा करणाऱ्या सुप्रभात सत्संग मंडळ चा हा आगळा दिशा जाईल व सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन संस्कृती परंपरा वेळेची बचत सोबत सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांचा पूर्वजांना प्रसन्न करणाऱ्या या भागवत कथेच्या कार्यक्रमात तन-मन-धनाने सहभागी व्हावे अशी विनंती सुप्रभात सत्संग मंडळाच्या वतीने महेंद्र पुरोहित यांनी केली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या