Ticker

6/recent/ticker-posts

तथाकथित मराठा नेत्यांना आरक्षण का टिकवता आले नाही?- ऐड आंबेडकर 

तथाकथित मराठा नेत्यांना आरक्षण का टिकवता आले नाही?- ऐड आंबेडकर 


अकोला
"हायकोर्टाने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला असताना, एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण ह्या तथाकथित मराठा नेत्यांना किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांना सुप्रीम कोर्टात गरीब मराठ्यांसाठी आरक्षण का टिकवता आले नाही? 


त्यांची आंतरवली सराठी येथे भेट आणि त्यांची पोकळ आश्वासने ही सर्व नौटंकी आहे. तसे नसते तर त्यांनी 'रयत मराठ्यांसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण' ह्या न्याय्य मागणीसाठी प्रयत्न केले असते, ताकद उभी केली असती, धोरण बदलायला दडपण आणले असते. 


उलट निजामी मराठा नेत्यांच्या भेटीमुळे ओबीसी आणि रयत मराठ्यांच्यामध्ये तणाव वाढला आहे.सर्व रयत मराठ्यांना माझे आवाहन आहे. ह्यातून दंगल न घडवता ही मार्ग निघू शकतो. निवडणुकीत जाती आधारित नाही तर मानवी मूल्यांवर, न्याय्य मागण्यांसाठी भूमिका घ्या. ह्याच मार्गाने आपल्या आरक्षणाची मागणी कोणत्याही समाजाला न दुखावता प्रभावी पध्दतीने पुढे रेटता येईल."



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या