उमरा येथे शॉक लागून युवकाचा मृत्यू
नासीर शेख
पातुर : तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत उमरा येथे विद्युत खांबाला दिलेल्या ताणमध्ये विद्युत प्रवाहाचा शॉक लागून युवकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजीच्या दुपारी उघडकीस आली, रुपेश संजय चिपडे १९ असे मृतक युवकाचे नाव आहे. रुपेश यांच्या घराचा बांधकाम सुरू असताना तेथे पाहणी करण्यासाठी घरून सकाळी निघाला होता, परंतु घरी परतला नाही,त्यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला असता, उमरा येथे एका विद्युत खांबाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला, घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक गणेश महाजन, हर्षल श्रीवास, ज्ञानेश्वर गीते, प्रशांत मेसरे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या