आयुर्वेदिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी
अकोला येथील आयुर्वेदिक रुग्णालयातील कामगार व क्लास फोर मधील कर्मचाऱ्यांना योग्य वेतनाचा लाभ देण्याच्या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय सम्राट सेनेतर्फे निदर्शने देण्यात आली. मागीर सत्र 2022 - 23 मधील या कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाने रोखले असून ते वेतन देण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे 👆स्पर्श करा
अकोला आयुर्वेदिक महाविद्यालय तथा रुग्णालयातील कामगारांना तीन ते चार हजार रुपये मानधन दिला जात आहे, परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना किमान दहा ते बारा हजार वेतन देण्यात यावे, अशी तरतूद असून सुद्धा या कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयातील कामगार व क्लास फोर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा, या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय सम्राट सेनेचे अध्यक्ष अनिल खंडारे, सम्राट सेना प्रमुख सविताताई देशमुख, सम्राट शिवसेनेचे आकाश शिरसाठ, रिपब्लिकन पार्टीचे नागसेन शिरसागर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या