जिल्ह्यासह तालुक्यात सुरू असलेली गोवंश तस्करी, कत्तलखाना व गोमांस विक्री; अन् पोलिसांची अचानक धडक कारवाई सुरू
मुर्तीजापुर तालुक्यातील ग्राम धोत्रा शिंदे येथे अवैध गोमांस विक्रेत्यावर कारवाई
85 किलो गोमांससह 45 हजाराचा मुद्देमाल जप्त;पाच जणांवर गुन्हा
मुर्तीजापुर प्रतिनिधी:- संतोष माने
मुर्तीजापुर:तालुक्यातील ग्रामीण पोलिसांनी दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 6:00 वाजताच्या सुमारास ग्राम धोत्रा शिंदे येथे गोवंश जनावराची कत्तल झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी सुमारे 45 हजार 400 रुपयाच्या मुद्देमालासह 85 किलो गोमांस व पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.सणासुदीचे दिवस श्रावण व अधिकमास सुरू असताना सुद्धा कत्तलीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे यातून समोर आले आहे.
अकोला जिल्ह्यातच नव्हे तर सर्व तालुक्यांमध्ये सुद्धा गोवंश हत्या बंदी कायद्याला येथील स्थानीय कसायांनी केराची टोपली दाखविली असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून येथील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याचे अनेकदा समोर आले आहे.आता सणासुदीला देखील नियमांचे उल्लंघन करत गोवंश जनावरांच्या कत्तली सुरूच असल्याने या व्यवसायाला नेमके आशीर्वाद कोणाचे?आता श्रावण अधिकमास सुरू असून काही दिवसांनी सणासुदीचे दिवस समोर असल्याने किमान या दिवशी तरी गोवंश जनावरांच्या कत्तली थांबतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मागील काही दिवसात अकोला जिल्ह्यासह मुर्तीजापुर बार्शीटाकळी तालुक्यात काही विशिष्ट ठिकाणी गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात पकडल्या जाऊन आरोपींना अटक सुद्धा झाली आहे.जिल्ह्यातील प्रतिबंधित गोवंश तस्करी व गोमांस विक्रीची एफआयआर डायरी पाहिली असता नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिलेले आहेत.
अशातच ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांना ग्राम धोत्रा शिंदे येथे गोवंश जनावराची कत्तल करून मास विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती.त्यामुळे पोलीस निरीक्षक यांनी पोलीस पथकाला संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता तेथे मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तल केलेले मास आढळून आले.यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून 5 आरोपींना रंगेहात ताब्यात घेऊन 85 किलो गोमास व गोमास कापणे विक्री व वाहतुकीसाठीचे साहित्य जप्त करून 45 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यावरून घटनास्थळावरून पकडण्यात आलेले आरोपी अब्दुल नौशाद अब्दुल सत्तार कुरेशी वय 44,अब्दुल रशीद कुरेशी अब्दुल सत्तार कुरेशी वय 48,मोहम्मद इलियास कुरेशी अब्दुल सत्तार कुरेशी वय 40, अब्दुल खलील अब्दुल खालिक वय 44, अब्दुल जलील अब्दुल खालीद वय 40 सर्व राहणार धोत्रा शिंदे तालुका मुर्तीजापुर यांना अटक करून ग्रामीण पोलीस ठाण्यात सर्व आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायदा कलम 5, 5 (क), 9,9 (अ) सहकलम 429,34 भादवी सहकलम 105/117 मपोका नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदरची धडक कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल संजय खंडारे, बाळकृष्ण नलावडे, सुदाम धुडगुंडे,रितेश मथ्थी, ड्रायव्हर आकाश लुंगे यांनी केली आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या