सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पदभरती करून सुरू करण्यासाठी आ. सावरकरांची विधिमंडळात लक्षवेधी मागणी
अकोला येथील सुसज्ज असलेल्या केवळ पद भरती अभावी रुग्ण सेवेत समर्पित न झालेले सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तातडीने रुग्णसेवेत सुरू करण्यासाठी सामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष असणारे आमदार रणधीर सावरकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे आज सभागृहात शासनाचे लक्ष वेधले, या लक्षवेधीला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी लवकरच बैठक घेऊन ताबडतोब भरती प्रक्रिया पूर्ण करून हॉस्पिटल जनतेच्या सेवेत रजू करू असे अभिवचन दिले.
रुग्णस सेवे त हॉस्पिटल सुरू करण्याकरिता आवश्यक ती पदभरती तातडीने करण्यात यावी समस्यांचे समाधान करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करावी, कुठलाही विना विलंब सेवा उपलब्ध करून द्यावी, यंत्रसामग्री सुसज्ज असताना रुग्णांना आपण सेवा देऊ शकत नाही याकडे आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहात शासनाचे लक्ष वेधले, बैठक लावण्याचे मा. मंत्री यांनी सांगितले, पद भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे, दीर्घकाळापासून बांधून रुग्णसेवेसाठी सुसज्ज असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करणे बाबत “ प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेंतर्गत अकोला येथे मंजूर असून सदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण होऊन वैद्यकीय सोयी सुविधा करिता सुसज्ज आहे.वैद्यकीय संचालनालयाने दि. २२ जानेवारी २०१८ नुसार १०१६ पदांपैकी ५८७ पदांचा प्रस्ताव मा. सचिव वैद्यकीय शिक्षण यांना सादर केलेल्या प्रस्तावानुसार फक्त ४६५ पदे मंजूर करून सदर पदे ३ टप्प्यात पदभरती करण्याचे शासन आदेश असून प्रथम टप्प्यातील २२३ पद भारतीसाठी मंजुरी देण्यात आली असली तरी अद्याप पर्यंत पदभरती करण्यात आली नाही.
केवळ पदभरती अभावी सदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गोर गरिब व गरजू रुग्णांच्या रुग्ण सेवेत रुजू झाले नाही. अशी खंत आमदार सावरकर यांनी आपल्या सभागृहातील भाषणाद्वारे करून लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारची लक्ष वेधले व ताबडतोब न्याय देण्याची मागणी केली पश्चिम विदर्भ हा मागासलेला असून आमचा जिल्हा आत्महत्याग्रस्त परिसर म्हणून ओळखला जातो या भागात न्याय देण्यासाठी शासनाने ताबडतोब निर्णय घ्यावा व सर्वसामान्यांना आधार द्यावा शासन सबका साथ सबका विकास सबका विश्वासाने सुरू असून विदर्भाचे जनतेला न्याय मिळेल असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त करून अकोला लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केंद्र सरकारकडून 120 कोटी रुपये मंजूर करून आणून तसेच राज्य शासनाच्या कडून 30 कोटी रुपये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तीस कोटी रुपये मंजूर करून आणून हा सर्वसामान्य आधार देणारा हॉस्पिटल उभा केला आहे. सावरकर यांनी सांगून राज्याचे सरकार हे सर्वसामान्यांचे असल्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढले आहे आमदार सावरकर म्हणाले . अकोला, बुलढाणा, वाशीम, हिंगोली अशा जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी अकोला येथे येतात सदर सुपर स्पेशालिट रुग्णालय सूरु न झाल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात महागडा व खर्चिक उपचार घ्यावा लागत असल्याने रुग्ण व नागरिकांमध्ये हॉस्पिटल सुरु न झाल्याने प्रचंड नाराजी व शासनाप्रती असंतोष निर्माण झाला आहे. करिता सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल रुग्ण सेवेत तातडीने सुरु करणे या बाबत शासनाची कार्यवाही.” अशी मागणी आमदार सावरकर यांनी केल्यावर राज्याचे मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी ताबडतोब बैठक घेऊन अधिकाऱ्यांसोबत ताबडतोब निर्णय घेऊन प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर हॉस्पिटल सुरू करू असे अभिवचन दिले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या