Ticker

6/recent/ticker-posts

'स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र'च्या अध्यक्षपदी अकोल्याचे शत्रुघ्न बिरकड 

'स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र'च्या अध्यक्षपदी अकोल्याचे शत्रुघ्न बिरकड 


'स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र'च्या अध्यक्षपदी अकोल्याचे शत्रुघ्न बिरकड यांची अविरोध झाली, तर उपाध्यक्ष म्हणून नागपूरचे डॉ. जयप्रकाश दुबळे व महासचिव म्हणून डॉ. संभाजी भोसले यांची निवड झाली स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची वार्षिक सर्वसाधारण सभा व कार्यकारिणीची निवडणूक पुणे येथे संपन्न झाली. त्यात ही निवड करण्यात आली. स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही जलतरण संघटना ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्नित असलेली राज्यातील एकमेव संघटना आहे. नवनियुक्त अध्यक्ष बिरकड म्हणाले की, स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेद्वारे राज्यातील स्विमिंग, डायव्हिंग, वॉटर पोलो, ओपन वॉटर स्विमिंग व प्रौढांच्या शत्रुघ्न बिरकड जलतरण विकासासाठी आम्ही लवकरच वार्षिक वेळापत्रक जाहीर करणार आहोत राज्यातील फक्त दोन ते तीन जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यातील जलतरणपटूंचे मोठ्या फार प्रमाणात नुकसान होत आहे. यापुढे हे नुकसान आम्ही होऊ देणार नाही. नियमित स्पर्धांचे आयोजन करू, राज्यातील जलतरणपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना सर्वतोपरी देण्यासाठी त्यांना सहकार्य करू, असेही शत्रुघ्न बिरकड म्हणाले. 


राज्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे-

उपाध्यक्ष पदी डॉ. जयप्रकाश दुबळे (नागपूर), राजेन्द्र निंबाळते (नाशिक), डॉ. प्रदीप देशमुख (लातूर), सचिव डॉ. संभाजी भोसले (नागपूर), सहसचिव श्रीराम पार्वताय (सोलापूर), - राजेश्वर खंगार (बुलढाणा), सुशील दुरुगकर (भंडारा), कोषाध्यक्ष महेंद्र कपूर (चंद्रपूर) तर सदस्य म्हणून समशेर पठाण (गडचिरोली) विजय पळसकर (बुलढाणा), भूपाली कुलकर्णी (अहमदनगर), अभय क्षीरसागर (बिड), रमेश गंगावणे (हिंगोली) , सुभाष देठे (जालना), आनंद मकवाना (गोंदिया), सुंदर लोमटे (उस्मानाबाद), आदित्य वानखडे (वाशिम), गणेश कुलकर्णी (अहमदनगर) यांची


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या