शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दिशादर्शक फलक लावा - उमेश इंगळे
अकोला प्रती - शासकीय सर्वोपचार रुग्णालयात कोणता वार्ड कुठं आणि कोणत्या दिशेने आहे, हे शोधण्यासाठी रुग्णांना खुप कसरत करावी लागते.कारण सर्वोपचार रुग्णालयात दिशादर्शक फलक व वार्ड नंबर लिहलेले नाहीत.त्यामुळे रुग्णांला नाहक त्रास सहन करावा लागत असुन रुग्णांची गैरसोय होत आहे. उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये, यांना वारंवार निवेदन देऊन दिशादर्शक फलक लावण्यात यावे या करीता निवेदन दिले परंतु अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आपणांस विनंती करतो की सर्वोपचार रुग्णालयात दिशादर्शक फलक लावावेत व रुग्णांची होणारी गैरसोय थांबवावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तिव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला.
अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी अजित कुंभार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदन देतेवेळी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखा अकोला जिल्हा अध्यक्ष डॉ अरुण चक्रणारायण, जिल्हा कार्याध्यक्ष देवीलाल तायडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब अंभोरे,यंशवत इंगोले, जिल्हा सचिव एम.एम.तायडे सर पर्यटन विभाग प्रमुख नंदरत्न खंडारे, जिल्हा सदस्य मधुकर सिरसाठ, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या