विद्युत तारेचा शॉक लागून लाईनमन ठार..
जंपर बसवताना लागला शॉक, माना परिसरातील घटना.
माना परिसरात अनेक विद्युत शॉक लागून मृत्यूच्या घटना घडत असून यावर विद्युत मंडळाचा नाकर्तेपणा व निष्काळजीपणाने आणखी एका मूर्तिजापूर येथील लाईन मेन चा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक ९जून रोजी दुपारच्या दरम्यान घडली.
सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेला यशवंत राऊत वय 33 वर्ष हा जामठी सेक्टर मध्ये येत असलेल्या माना फाट्याजवळ विद्युत खांबवर जंपर बसवीत असताना अचानक त्याचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागला त्याला उपचारासाठी मुर्तीजापुर येथील लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालयात नेले असता. यशवंत राऊत या लाईनमंचा मृत्यू झाल्याचे समजले.
यामुळे विद्युत वितरणचा नाकर्तेपणा व हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस विद्युत शॉक लागण्याचे तांडव सुरूच असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. अशी मागणी गावातील जनतेची आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या