Ticker

6/recent/ticker-posts

ट्रकच्या धडकेत दोन जण जागीच ठार; एक जन गंभीर

ट्रकच्या धडकेत दोन जण जागीच ठार; एक जन गंभीर


मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या अनमोरा जवळ भरगाव वेगाने येणाऱ्या टँकर चालकाने दुचाकी वाहनास समोरुन जबर धडक दिल्याने दोन जन जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.


प्राप्त माहितीनुसार, अनभोरा येथील राष्ट्रपाल नाजूक क्षीरसागर (२०), मोहन खंडारे (३०) व मिलिंद नागसेन चक्रे (२५) तिघेही राहणार अनमोरा हे एमएच २७ एएच ७१५० क्रमांकाच्या दुचाकीने कोळंबी जवळून पेट्रोल भरून येत असता अनभोरानजिक समोरुन येणाऱ्या जीजे ०३ बीटी ९५८२ क्रमांकाच्या टँकरचालकाने भरधाव वेगाने चालवत दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील राष्ट्रपाल नाजूक क्षीरसागर (२०), मोहन खंडारे (३०) हे टँकरच्या खाली आल्याने जागीच ठार झाले तर मिलिंद नागसेन चक्रे (२५) हा गंभीर असल्याने त्यास प्रथमोपचारकरिता  स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तातडने अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 


गंभीर जखमीला उपचारार्थ हलविले

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविन्द पांडव पोलिस उपनिरिक्षक सत्यजित मानकर, हेकाँ दिपक कानडे घटनास्थळी रवाना होऊन गंभीर जखमीला तत्काल रुग्णालयात रवाना केले. सदर प्रकरणी वृत्त लीहीपर्यंत गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरु होती.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या