शेतकरी पुत्राची आत्महत्या:समाजमन सुन्न-मधापूरी येथील दुर्देवी घटना
मुर्तीजापुर: मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी गावात एका शेतकऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधापुरी (महाराष्ट्र) या गावातील कृषी भूषण सन्मानित शेतकरी सुधाकर बनाईत यांचा मुलगा अविनाश सुधाकर बनाईत (वय 35) याने आज दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली.नेहमीप्रमाणे सकाळी शेतावर जावून मजुरांच्या हातून काम घेऊन दुपारी १२ वाजेपर्यंत घरी येत असे. मात्र आज दुपारी तीन वाजेपर्यंत अविनाश घरी परतला नाही.त्यामुळे त्याला शोधण्यासाठी वडील शेतात गेले असता त्यांना मुलगा अविनाश आंब्याच्या झाडाला लटकलेला दिसला. वृत्त मिळेपर्यंत मानाकुरुम पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अविनाश बानायेत यांचा विवाह पाच-सहा वर्षांपूर्वी झाला होता, पण दोन वर्षांनी त्यांचा लगेच घटस्फोट झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे.त्यामुळे तो नेहमी अस्वस्थ होता.
0 टिप्पण्या