अक्षय भालेराव यांची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
नांदेड मधील बोंढार गावात जातीवादी मानसिकतेतून समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अक्षय भालेराव यांची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यत आली. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी व सदरचे प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टात चालवावे या मागणी करतात सम्राट अशोक सेने तर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने देण्यात आली. सदर प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली, यावेळी सम्राट अशोक सेने आकाश शिरसाट व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या