राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पुन्हा शरद पवार, कार्यकर्त्यांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष
पेढे वाटून, फटाके फोडून केली दिवाळी साजरी
यश सावंल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदा वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.
या घोषणा नंतर आज संपूर्ण राज्यभर त्यांच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अकोल्यामध्ये सुद्धा गांधी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यश सावंल यांच्या सहक ार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाईवाटून आनंद उत्सव साजरा केला. त्यावेळी त्यांनी ढोल ताशाच्या गजरात हीच आपली दिवाळी म्हणून जल्लोष केला.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करुन मी माझा राजीनामा मागे घेतो. मागील तीन दिवसांपासून देशभरातील कार्यकर्ते आणि पक्षांनी मला निर्णय मागे घेण्यासंदर्भात विनंती केली होती. कार्यकर्त्यांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याचं पवारांनी जाहीर केलं. मात्र मला या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे, त्यासाठी पक्षाचा उत्तराधिकारी निर्माण व्हायला हवा. त्यामुळे पक्षात काही संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हेच राहतील असे स्पष्ट झाल्यानंतर अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या