सहकार महर्षी कै. अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दी महोत्सवाचा शुभारंभ
कै. अण्णासाहेबांसारखा लोकहितैषी नेता आता होणे नाही- रमेश हिंगनकर
संपुर्ण कार्यक्रम येथे 👆 बघावा
अकोला: लोकहितैषी कै. अण्णासाहेब कोरपे यांचे जीवनकार्य नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. सहकार क्षेत्रातच नव्हे तर राजकीय, सामाजिक, कृषी, शिक्षण क्षेत्रातील त्या योगदान कदापिही विसरता येणार नाही. विविध आंदोलनात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा दिला. ऐसा लोकहितैषी नेता पुन्हा होणे नाही, असे भावोद्गार ज्येष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर यांनी काढले. कापूस उत्पादक चळवळीचे प्रणेते कृषी, सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अग्रणी व लोकहितैषी नेतेने समाजभूषण कै. अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव शुभारंभाच्या कार्यक्रमात नानासाहेब हिंगणकर बोलत होते.
यावेळी डॉ. अण्णासाहेब कोरपे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. ३ मे ते १२ ऑक्टोबर दरम्यान कै. डॉ. अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दी महोत्सवांतर्गत विविध समाज प्रबोधनात्मक व लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. हिदायत पटेल, भारती गावंडे, पुरुषोत्तम चौखंडे यांनी यावेळी बोलताना अण्णासाहेब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच सहकारमहर्षी कै. डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांचे योगदान एका क्षेत्रात किंवा एका समाजासाठी नसून, सर्वांसाठी आणि सर्वच क्षेत्रांत त्यांचे भरीव योगदान असल्याने अण्णासाहेब हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच दैवत असलेले व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन माजी कृषीमंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी बुधवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
कापूस उत्पादक चळवळीचे प्रणेते, अकोला, वाशिम जिल्हा बँकेच्या प्रगतीचे शिल्पकार अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कचेरीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये महादेवराव भुइभार, माजी मंत्री अझहर हुसेन, गुलाबराव गावंडे, डॉ. डी. एम. भांडे, सुभाषराव ठाकरे, आमदार अमित देशमुख, आ. किरण सरनाईक, माजी आ. वसंतराव खोटरे, तुकाराम बीरकड, हरिदास भदे, बबनराव चौधरी, नारायणराव गव्हाणकर, गजानन दाळू गुरुजी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषदादा कोरपे, उपाध्यक्ष श्रीधरराव कानकीरड, संचालक रमेश हिंगनकर, वामनराव देशमुख, शिरीष धोत्रे, दि अकोला जनता बँकेचे अध्यक्ष ग्यानचंद गर्ग, सुभाष कोरपे, सुहासिनीताई धोत्रे, अनुप धोत्रे, अदिती पोहरे, डॉ. रणजित सपकाळ, हिदायत पटेल, वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ, माजी महापौर विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, प्रकाश तायडे, गोपालजी खंडेलवाल, राजेश राऊत व भारतीताई गावंडे उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या