अवकाळी पावसाचा कुलर व्यवसायिकांना फटका
उन्हाच्या तडाखा पासून गारवा मिळविण्यासाठी उन्हाळ्याची चाहूल लागताच एसी, कूलर, डेझर्ट, पंखा, फ्रीजची मागणी वाढते. यंदा, मात्र अवकाळी पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने या उपकरणांच्या दुकानाकडे ग्राहक फिरकत नसल्याचे चित्र अकोला बाजारपेठेत दिसत आहे. मागील वर्षी मार्च एप्रिल महिन्यात 500 ते 600 कुलर विकल्या जात होते. यंदा मात्र मोठ्या मुश्कलीने एक टक्का कुलर विकल्या गेले आहेत.
संपूर्ण बातमी पाहण्यासाठी 👆 येथे क्लिक करा
अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे गतवर्षीच्या तुलनेत मागणीवर परिणाम होऊन किमती स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यावर्षी सातत्याने ढगाळ वातावरणामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचेही ते म्हणाले. उन्हाळा लागला की कूलर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. गारवा देणाऱ्या उपकरणांच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेकडे वळतात. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण मुळे गतवर्षीच्या तुलनेत मागणीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सद्य स्थितीत व्यवसायावर परिणाम झाला असुन पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे एसी, कूलरच्या किंमती स्थिर झाल्या आहेत. उन्हाचा पारा चढला तर गारवा देणारे उपकरणांची विक्री जोमात होण्याची शक्यता आहे. निसर्गाने साथ दिली तर निश्चितच कुलर व्यवसाय चालू व्यवसायिकांना थोडाफार दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
0 टिप्पण्या