हरिपाठ म्हणजे भगवंताचे स्मरण !- बालकिर्तनकार प्रथमेश डोंगरे
--------------------------------------------
बाल किर्तनकाराने गाजविला किर्तनाचा फड
--------------------------------------------
आकोट
देवाच्या दारी क्षणभर जरी उभे राहीलात तर सलोकता, स्वरुपता, समीपता आणि सायुज्यता ह्या चारही मुक्ती साधता येते.त्यासाठी नित्य नेमाणे हरिपाठ करा.हरिपाठ म्हणजे भगवंताचे स्मरण होय असे प्रतिपादन येथील बाल संस्कार शिबीराचा उदयन्मुख बाल किर्तनकार ह.भ.प. प्रथमेश महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे १ मे पासून सुरु असलेल्या बाल संस्कार शिबीरात एकादशी किर्तनात प्रथमेश महाराज डोंगरे या चिमुकल्यांने आपल्या ओजस्स्वी व मधूर वाणीने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकत "हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी' ।। या प्रस्तुत ज्ञानराज माऊलींच्या अभंगाचे चिमुकल्या निरुपण केले.अंतरंगाच्या शुद्धतेने भगवंताचे स्मरण केल्यास भगवंत प्रसन्न होतो. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला असे सांगून अनेक दृष्टांतातून अभंगाचा भावार्थ त्याने प्रगट केला.
ह.भ.प.अमोल डोंगरे नागपूर यांचा १० वर्षाचा प्रथमेश मुलगा आहे..तो प्रज्ञावंत आहे.कुशाग्र बुद्धीमता व वक्तृत्व कौशल्याने बाल वयातच किर्तनाचा फड गाजवून गेला.आई वडीला कडून प्राप्त संस्कारातून आध्यात्मिक शिक्षणाची आवड निर्माण झाली.गीता व ज्ञानेश्वरी वाचन ,चिंतन व अभ्यास करु लागला आहे.नागपूर येथील गीता ज्ञान स्पर्धा परिक्षेतही त्याने प्रथम क्रमांक पटकावला. श्रद्धासागर येथील बालसंस्कार शिबीराचा तो दुस-या वर्गाचा विद्यार्थी आहे.गुरुवर्य वासुदेव महाराजांचे आशीर्वाद व शिबीर प्रमुख ह.भ.प.अंबादास महाराज व उमेश मोहोकार यांचे मार्गदर्शन लाभले आहे
*'प्रथमेश' शिबीरातील संस्काराचे मधूर फळ*
---------------------
बाल वैष्णव प्रथमेश यांने आपल्या उज्वल भविष्याची चुणूक दाखविली आहे. हे या शिबीरातील संस्काराचे मधूर फळ आहे.बालवयातच त्याची झेप निश्चितच तो नामांकीत किर्तनकार म्हणून ओळख निर्माण करेल अशा शब्दात संस्थेचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर यांनी प्रथमेशचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्यात. बळीराम गीते(गुरुजी) यांनी शाल श्रीफळ देवून त्याचा सत्कार केला
गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली शिबीरार्थी बाल वैष्णवांनी विणेकरी,मृदंगाचार्य, गायनाचार्य,टाळकरी,चोपदार होत उत्तम साथ संगत दिली हे विशेष
किर्तनाला शिबीरार्थी,त्यांचे पालकांसह भाविक उपस्थित होते.
--------------------------------------------
0 टिप्पण्या