Ticker

6/recent/ticker-posts

धारदार शस्त्राने युवकावर हल्ला, युवक गंभीर जखमी

धारदार शस्त्राने युवकावर हल्ला, युवक गंभीर जखमी


सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
अमानतपुर ताकोडा येथील रहिवासी आकाश राजू इंगळे यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्राने डोक्यावर व हातावर गंभीर स्वरूपाचे हल्ला करण्यात आला. यामध्ये आकाश इंगळे गंभीर जखमी असून त्यावर शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला पूर्व-वैमनशातून झाला असून याआधी सुद्धा दोन वेळा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. सदरील प्रकरणी डाबकी रोड पोलीस स्टेशन अकोला येथे 8 मे 2023 रोजी तक्रार दाखल केली होती, परंतु यावर कोणतेही कारवाई न झाल्यामुळे आरोपी किरण सुभाष मोरे यावर पोलिसांचा कुठलाही दबा नसल्यामुळे आज 10 मे 2023 रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान त्याने धारधार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये आकाश इंगळे हा गंभीर जखमी झाला असून आरोपी सध्या फरार आहे. याप्रकरणी आकाश इंगळे यांच्या नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तक्रार दाखल केली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ पोलीस स्टेशन डाबकी रोड यांना कारवाई करण्याचे आदेश दिले व सदरील प्रकरणाचा डाबकी रोड पोलीस तपास करून आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी सौ. रंजना राजु इंगळे, प्रिती इंगळे याच्यासह 35 ते 40 नातेवाईक उपस्थित होते.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या