Ticker

6/recent/ticker-posts

महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोला विमानतळावर स्वागत

महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोला विमानतळावर स्वागत


अकोला
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आज सायंकाळी सहा वा. सुमारास अकोला विमानतळावर आगमन झाले. यावेळी  विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे  यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनीही त्यांचे स्वागत केले. यावेळी विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. हरिष पिंपळे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी बाळापूर डॉ. रामेश्वर पूरी आदी उपस्थित होते. अकोला विमानतळावरुन श्री. विखे पाटील हे मोटारीने शेगावकडे रवाना झाले.


अकोल्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजूर झाले होते त्याला गती देण्यात यावी अशी मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी करताच ताबडतोब जिल्हाधिकारी उप जिल्हाधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन जागे संदर्भातली व विविध आणि अडचणीवर चर्चा विनिमय करून आमदार रणधीर भाऊ सावरकरयांच्या सूचना चे तंतोतंत करा निर्देशशनामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. आज कृषी पशु पशुपालन मंत्री नामदार राधाकिसन विखे पाटील राज राजेश्वर नगरीमध्ये आगमन झाल्यावर त्यांचं विमानतळावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून विविध विषयावर त्यांनी चर्चा विनिमय केला यावेळी आमदार रणवीर सावरकर यांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या पशुवैद्य महाविद्यालय संदर्भातला प्रश्न उपस्थित केला त्यावर त्यांनी निवासी जिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे व विविध अधिकाऱ्यांना सूचना देऊन उद्या सकाळी या संदर्भात रिपोर्टिंग करण्याचे व जागे संदर्भातला व विविध विषयावर त्यांनी जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाबद्दल चर्चा विनिमय केला यावेळी तहसीलदार पाटील तसेच विमानतळावर जिल्हाधिकारी निरमा अरोरा आयुक्त विभा पांडे हे सुद्धा उपस्थित होते यावेळी अनेक सूचना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.


आज विमानतळावर आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात अनुप धोत्रे उ. या गिरीश जोशी माधव मानकर, संजय गोडा संजय गोटफोडे, रमेश आ खोपरे जयंत मसने, एडवोकेट देवाशिष काकड वैभव माहोरे अनिल गावंडे अनिल मुरुमकार संतोष पांडे चंदू अंधारे, अभिमन्यू नलकांडे अक्षय जोशी मोहन पारधी, अमोल गोगे, गुल्हाने, गणेश अंधारे पवन महाले विकी ठाकूर अमित कावरेकावरे रमेश दुतोडे रावसाहेब काबे कोमल तायडे आधी उपस्थित होते यावेळी गिरीश जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा नामदार विखे पाटील यांनी दिल्या,


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या